Join us

सलमान खानला झालेला Brain Aneurysm आजार नेमका काय? लक्षणं कोणती-कारणं काय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:55 IST

Salman Khan Open Up On HIs Health: सलमान खाननं सांगितलं की, त्याला ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया, ब्रेन अ‍ॅन्यूरिज्म आणि एवी मालफॉर्मेशन हे आजार आहेत.

What Is Brain Aneurysm: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आपल्या सिनेमांसोबतच आपल्या फिटनेससाठी सुद्धा लोकप्रिय आहे. फिटनेससाठी त्याला लाखो तरूण फॉलो करतात. पण सलमान खान यानं त्याच्या एका आजाराबाबत खुलासा केला. अलिकडेच सलमान खान 'कपिल शर्मा शो' मध्ये आला होता. यावेळी त्यानं सांगितलं की, त्याला एक गंभीर आजार आहे. इतकंच नाही तर या आजारामुळे त्याचं चालणं-फिरणं सुद्धा अवघड होतं. 

सलमान खानचं वय ५९ वर्ष आहे. तरी या वयातही तो भरपूर काम करत आहे. त्याच्याकडे पाहून असं अजिबात वाटत नाही की, त्याला कोणता आजार असेल. सलमान खाननं सांगितलं की, त्याला ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया, ब्रेन अ‍ॅन्यूरिज्म (Brain Aneurysm) आणि एवी मालफॉर्मेशन हे आजार आहेत.

काय आहेत हे आजार?

ट्रायजेनिमल न्यूरेल्जिया - या आजारात व्यक्तीला चेहऱ्यावर अचानक प्रचंड वेदना होऊ लागतात.

एवी मालफॉर्मेशन - या आजारात रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह थांबतो किंवा कमी होतो.

काय आहे ब्रेन अ‍ॅन्यूरिज्म? 

Brain Aneurysm एक गंभीर पण सायलेंट आजार आहे. हा आजार झाला तर मेंदूतील रक्तवाहिन्या फुगतात किंवा त्यांमध्ये  फुगे येतात. बबल तयार होतात. याला cerebral aneurysm किंवा intracranial aneurysm नावानंही ओळखलं जातं. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये दाब वाढू लागतो, तेव्हा ब्रेन अ‍ॅन्यूरिज्मची समस्या होते. ब्रेन अ‍ॅन्यूरिज्मचा आकार वाढत जातो. जर ही गाठ फुटली तर मेंदूमध्ये ब्लीडिंग होऊ लागतं. याला hemorrhagic stroke असं म्हणतात. जर एखादा अ‍ॅन्यूरिज्म फुटला, तेव्हा  जीवही जाऊ शकतो. यावर लगेच उपचार करणं गरजेचं असतं.

काय आहेत या आजाराची लक्षणं?

चिंताजनक बाब म्हणजे बराच काळ या आजाराची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे याला सायलेंट किलर म्हटलं जातं. या आजाराची काही लक्षणं खालीलप्रमाणे सांगता येतील.

- अचानक किंवा फार जास्त डोकेदुखी

- डोळ्यांमागे वेदना किंवा दबाव जाणवतो

- डबल व्हिजन

- काही केसेसमध्ये व्हिजन लॉस

- मान दुखणे

- उलटी किंवा मळमळ

- बेशुद्ध पडणे

- झटके येणे

कुणाला असतो जास्त धोका?

हाय ब्लड प्रेशरचे रूग्ण असाल तर या आजाराचा धोका वाढतो. तसेच धुम्रपान आणि मद्यसेवन करणाऱ्या लोकांना सुद्धा याचा धोका अधिक असतो. जर कुटुंबात कुणाला झाला असेल तर तुम्हाला सुद्धा हा आजार होण्याचा धोका असतो. ४० ते ६० वयाच्या लोकांमध्ये या आजाराचा धोका अधिक असतो.

हाय ब्लड प्रेशर आणि ब्रेन अ‍ॅन्युरिज्म कनेक्शन 

बऱ्याच काळापासून हाय ब्लड प्रेशर राहिलं तर मेंदूच्या नसा कमजोर होऊ लागतात. त्यामुळे यात कोणत्याही जागी फुगवटा होऊन अ‍ॅन्युरिज्म बनू शकतो. हाय बीपीमुळे ब्लडचा दबाव वाढतो, ज्यामुळे कमजोर नस फाटण्याचा धोका वाढतो.

टॅग्स : सलमान खानआरोग्यहेल्थ टिप्ससेलिब्रिटीसोशल मीडिया