Winter sleeping tips: सगळीकडेच आता कडाक्याची थंडी पडत आहे. सायंकाळी पसरलेलं धुकं सकाळी ९ पर्यंत तसंच राहतं. अशात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. कुणी ब्लॅंकेटमध्ये दडून बसतं तर कुणी स्वेटर किंवा जॅकेट घालतात. कधी कधी तर थंडी इतकी जास्त असते की, बरेच लोक स्वेटर घालूनच झोपतात. याने थंडीपासून बचाव तर होतो, पण कधी विचार केलाय का की, स्वेटर घालून झोपणं किती योग्य असतं? या सवयीने आपलं किती नुकसान होतं? अशात रात्री स्वेटर घालून झोपल्याने शरीरावर काय परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत.
हेल्थ एक्सपर्टनुसार, रात्री गरम कपडे घालून झोपणं मोठी चूक आहे. असं केल्याने आरोग्याचं नुकसान होतं. या सवयीने अनेक समस्या होतात. थंडीच्या दिवसात शरीर रात्री आपलं तापमान १८ ते २१ डिग्रीपर्यंत ठेवतं. जेणेकरून गाढ आणि चांगली झोप लागावी. जेव्हा आपण स्वेटर घालून झोपतो तेव्हा तापमान अधिक वाढतं. असं झाल्यावर सगळ्यात आधी झोपमोड होते. सोबतच इतरही काही समस्या होतात. त्या बघुयात.
रात्री स्वेटर घालून झोपणं घातक
खाज सुटू शकते जर रात्री गरम कपडे घालून झोपाल तर खाज आणि रॅशेजची समस्या होऊ शकते. कारण जास्तीत जास्त गरम कपडे हे जाड आणि रफ फायबरपासून बनवलेले असतात. जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरात घाम येतो. जेव्हा फायबर त्वचेवर घासलं जातं, तेव्हा खाज येते. शरीरावर रॅशेज येऊ शकतात. लाल चट्टेही येऊ शकतात.
अस्वस्थता आणि गुदमरल्यासारखं वाटणे
रात्री गरम कपडे घालून झोपल्यास आपल्याला अस्वस्थ किंवा गुदमरल्यासारखं वाटू शकतं. कारण गरम कपडे हे टाइट विणलेले असतात. ज्यामुळे शरीराला हवा कमी मिळते. काही लोकांना ऑक्सिजन ब्लॉक झाल्यासारखंही वाटू शकतं. कारण शरीराला व्हेंटिलेशन मिळत नाही. अशात झोपमोड होते आणि बरेच तास मग झोपच येत नाही.
कुणासाठी जास्त घातक
ज्या लोकांना बीपी आणि हृदयाचा त्रास असतो त्यांच्यासाठी रात्री गरम कपडे घालून झोपण सगळ्या घातक ठरतं. असे काही असलेल्या लोकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण गरम कपडे शरीरातील उष्णता बाहेर निघू देत नाहीत. यामुळे ब्लड सर्कुलेशन प्रभावित होतं. अनेकदा तर बीपी फ्लक्चुएशनही होऊ शकतं. तसं रात्री स्वेटर घालून झोपणं पूर्णपणे चुकीचं नाही. पण ते फार जास्त गरम असू नये याची काळजी घ्यावी. हलके गरम कपडे घालू शकता.
