Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पोट सुटलंय-वजन वाढलं? झोपताना १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, झरझर उतरेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:54 IST

Weight Loss Tips : कमी खाणं आणि वर्कआऊटमुळे वजन कमी होत नाही तर शरीरातील काही हॉर्मोन्सही वजन कमी  करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

लठ्ठपणा सध्याची एक सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक डायटिंग करतात तरीही पोट कमी होत नाही. प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरून वजन कमी करण्यासाठी खास माहिती शेअर केली आहे.  या व्हिडिओमध्ये डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी एक सोपा उपाय शेअर केला आहे ज्यामुळे शरीरातील जास्तीचे फॅट कमीत कमी वेळात बर्न होण्यास मदत होईल. (Which Night Drink Is Best For Weight Loss American Doctor Eric Berg Shares Recipe)

 हे ड्रिंक का फायदेशीर

डॉक्टर बर्ग सांगतात की फक्त कमी खाणं आणि वर्कआऊटमुळे वजन कमी होत नाही तर शरीरातील काही हॉर्मोन्सही वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. खासकरून कोर्टिसोल आणि इंसुलिन यांसारखे हॉर्मोन्स जर वाढले तर शरीरात फॅट बर्न होत नाही आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात.

डॉक्टर बर्ग सांगतात की फक्त  जेवण कमी  केल्यानं किंवा वर्कआऊट जास्त केल्यानं वजन कमी होतं असं नही. शरीरातील काही हॉर्मोन्स यात महत्वाची भूमिका बजावतात. खासकरून कॉर्टिसोल आणि इंसुलिन वाढले तर शरीरात फॅट बर्न होण्यात अडथळे येतात. ज्यामुळे वजन कमी होत नाही.

रात्री जर कोर्टिसोल जास्त असेल तर झोप दीर्घकाळ येत नाही. ज्यामुळे शरीर व्यवस्थित फॅट बर्न करू शकत नाही.अशा स्थितीत वजन कमी करण्यासाठी चांगली झोप येणं फार महत्वाचे असते. तुम्ही लेमन बाम टी तयार करून पिऊ शकता. झोपण्याच्या  ६० मिनिटं आधी लेमन बाम टी प्यायल्यानं शरीर रिलॅक्स राहते. ताण-तणाव कमी होतो. झोप चांगली लागते आणि शरीर नैसर्गिकरित्या फॅट बर्न करते.

 लेमन बाम टी कशी करावी?

लेमन बाम टी तयार करण्यासाठी १ कप ताजी लेमन बामची पानं, मध आणि लिंबाची आवश्यकता असेल.  सगळ्यात आधी सुकी पानं १ ग्लास पाण्यात घालून व्यवस्थित उकळवून घ्या. जेव्हा पाणी अर्ध राहील तेव्हा गाळून एका ग्लासमध्ये घ्या. हलकं कोमट झाल्यानंतर पाण्यात थोडा लिंबाचा रस मिसळून घ्या. तुम्ही यात चवीनुसार मीठ आणि मध घालू शकता.

व्हिडिओमध्ये डॉक्टर बर्ग सांगतात की या हर्बल टीमध्ये थोड्या प्रमाणात मॅग्नेशियम ग्लायसिनेट पावडर मिसळू शकता. यामुळे मांसपेशींना आराम मिळतो. शरीर शांत होते तसंच इंसुलिन लेव्हल आणि कॉर्टिसोल कंट्रोल ठेवण्यास मदत होते.

या गोष्टींची काळजी घ्या

हर्बल टी च्या सेवनासोबत काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. रात्रीच्यावेळी स्नॅकिंग करू नका. यामुळे इंसुलिन वाढते आणि फॅट कमी करणं कठीण होतं.

झोपण्याच्या ९० मिनिटं आधी जास्त पाणी किंवा ड्रिंक घेऊ नका. असं केल्यानं युरीन प्रेशर तयार होतं ज्यामुळे सतत झोप-मोड होते.

लो कार्ब्स डाएट घ्या जेणेकरून इंसुलिन लेव्हल मेंटेन राहील. रोज वेगवेगळ्या वेळी वॉक करा. ज्यामुळे ताण-तणाव कमी होईल आणि झोपही चांगली येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Drink this before bed to lose weight fast: Doctor's advice.

Web Summary : American doctor Eric Berg suggests lemon balm tea before bed for weight loss. It helps reduce cortisol, improve sleep, and burn fat effectively by relaxing the body and controlling insulin levels. Avoid late-night snacks and maintain a low-carb diet.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स