आजकाल सोशल मीडियावर ओजेंपिकची बरीच चर्चा आहे. हे एक औषध आहे ज्यामळे डायबिटीस कंट्रोल करण्यात मदत होते. फक्त सर्व सामान्य लोकच नाही तर सेलिब्रेटीसुद्धा ओजेंपिकचे सेवन करतात. ओजेंपिक वजन कमी करण्यात मदत करते असा दावा केला जात आहे. कमी वेळात जास्त वजन कमी होण्यासाठी हे फायदेशीर ठरते. पण कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. (Is Home Made Ozempic Drink Good For Health And Can reduce fat) डायटिशियन मनप्रीत यांनी घरच्याघरी हे ड्रिंक बनवण्याची रेसिपी शेअर केली आहे. जर तुम्हाला कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय आपलं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर फायदे देणारं हे ड्रिंक तुम्ही तयार करू शकता.
ओजेंपिक एक असं औषध आहे जे डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. एका अभ्यासातून समोर आलं की हे औषध घेणाऱ्या लोकांनी एक वर्षात १५ टक्के वजन कमी केलं होतं. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या रिपोर्टनुसार २० १७ मध्ये हे ड्रिंक लोकांसमोर आले आणि २०२१ पासून वजन कमी करण्यासाठी लोक घेऊ लागले. हे एक इंजेक्टेबल औषध असून इंजेक्शननं घेतलं जातं. ३० किंवा त्यापेक्षा जास्त बीएमआय असलेल्या लोकांना हे औषध घेण्याचा सल्ला दिला जातो.
ओजेंपिक शरीरात जीएलपी१ नावाच्या हॉर्मोनचा प्रभाव वाढवते. हे हॉर्मोन ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते आणि भूक कमी करते. ज्यामुळे भूक कमी लागते आणि वेगानं वजन कमी करण्यास मदत होते. टाईप २ डायबिटीस असलेल्या लोकांसाठी हे बनवण्यात आलं आहे. याचा वापर करून वजनही कमी करता येतं.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी ओजेंपिक डाएट करण्याची काही गरज नाही. जर कोणत्या व्यक्तीचा बीएमआय २० पेक्षा जास्त आहे जर हे औषध घेऊ शकतात. वजन जास्त आहे तसंच डायबिटीसची समस्या असल्यास हे फायदेशीर ठरू शकते (Ref) पण आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ओजेंपिक औषधाचा वापर केल्यानं उलट्या होणं, जीव घाबरल्यासारखं होणं, पोटात जळजळ उद्भवते म्हणून डॉक्टरांचा सल्ला आधी घ्या.
पोट खूपच सुटलंय? चपाती बनेल फॅट कटर; कणकेत 'हा' पदार्थ मिसळून करा-भराभर घटेल चरबी
घरच्याघरी हे ड्रिंक कसं तयार करायचं
जर तुम्हाला याचे अधिकाधिक फायदे हवे असतील तर सगळ्यात आधी १ ग्लास गरम पाण्यात १ चमचा मेथीचे दाणे घाला. त्यात दालचिनीचे तुकडे आणि एक चिमूटभर जांभळाच्या बियांची पावडर घालू शकता. हे सर्व पदार्थ रात्रभर भिजवण्यासाठी तसंच ठेवू द्या. दुसऱ्या दिवशी यात लिंबू पिळून एक टिस्पून चिया सिड्स बरोबर याचे सेवन करा. चांगल्या परिणामांसाठी सकाळच्यावेळी हे ड्रिंक प्या.