Join us

हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 17:54 IST

पाण्याअभावी शरीरात डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशनमुळे थकवा आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात.

आपल्यापैकी बरेच जण तहान लागल्यावरच पाणी पितात. सर्वांना माहिती आहे की, पाणी पिणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र आता जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या लेटेस्ट रिसर्चमध्ये हे स्पष्ट झालं आहे की, जर तुम्ही पुरेसं पाणी प्यायला नाहीत तर शरीरातीस स्ट्रेस लेव्हल वाढू शकते. काम, रिलेशनशिप आणि चुकीच्या लाईफस्टाईल व्यतिरिक्त पाण्याअभावी स्ट्रेस लेव्हल वाढू शकते. 

आपल्या शरीराचा सुमारे ६०-७०% भाग पाण्याने बनलेला आहे. म्हणूनच पाण्याला 'अमृत' म्हटलं जातं आणि प्रत्येक लहान-मोठ्या शारीरिक कार्यासाठी पाणी आवश्यक असतं आणि त्याची कमतरता शरीरावर लगेच परिणाम करते. पाण्याअभावी शरीरात डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशनमुळे थकवा आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात.

'हिब्चुअल फ्लुइड इनटेक अँड हायड्रेशन स्टेटस इन्फ्लुएंस कॉर्टिसोल रिअ‍ॅक्टिव्हिटी टू अ‍ॅक्युट सायकोसोशल स्ट्रेस' या शीर्षकाखाली जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये ३२ तरुणांना दोन गटांमध्ये विभागण्यात आलं. पहिल्या गटात 'कमी द्रवपदार्थ' पिणारे होते जे दररोज १.५ लीटरपेक्षा कमी पाणी पित होते.

दुसऱ्या गटात 'जास्त द्रवपदार्थ' पिणारे होते जे दररोज हायड्रेशनच्या प्रमाणानुसार पाणी पित होते. दोन्ही गटांना ट्रायर सोशल स्ट्रेस टेस्टमधून बाहेर काढण्यात आलं. चाचणी दरम्यान दोन्ही गटांना जवळजवळ समान पातळीची चिंता आणि हृदयाची गती वाढल्याचा अनुभव आला. परंतु फक्त कमी द्रवपदार्थ असलेल्या लोकांमध्येच कोर्टिसोलच्या पातळीत तीव्र वाढ दिसून आली. याचा अर्थ असा की, डिहायड्रेशन शारीरिकदृष्ट्या तणावाची प्रतिक्रिया वाढवतं.

शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा व्हॅसोप्रेसिन हार्मोन एक्टिव्ह होतो. हा हार्मोन शरीरात पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतो, परंतु त्याच वेळी ते मेंदूतील स्ट्रेस सेंटर देखील एक्टिव्ह करतं, ज्यामुळे शरीरातील मुख्य स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल मोठ्या प्रमाणात रिलीज होतं. अशा परिस्थितीत, लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठातील संशोधकांनी इशारा दिला आहे की, दीर्घकाळापर्यंत हाय कोर्टिसोल लेव्हल हृदयरोग, मधुमेह आणि नैराश्याचा धोका वाढवू शकतो.

दररोज किती पाणी पिणं योग्य?

सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महिलांनी दररोज सुमारे २ लीटर पाणी प्यावं आणि पुरुषांनी सुमारे २.५ लीटर पाणी प्यावं. पाण्याची कमतरता फक्त साधं पाणी पिऊनच नव्हे तर चहा, कॉफी किंवा सूप यांसारख्या पेय पिऊन देखील पूर्ण केली जाऊ शकते.

रिसर्चचे को-रायटर डॉ. डॅनियल काशी यांनी सल्ला दिला आहे की, विशेषतः स्ट्रेसफुल दिवसांमध्ये, तुमच्यासोबत पाण्याची बाटली ठेवणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. हे केवळ शरीराला स्ट्रेसचा सामना करण्यास मदत करत नाही तर दीर्घकाळ आरोग्याचं रक्षण देखील करतं. या रिसर्चमधून एक गोष्ट स्पष्ट होते की हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणं ही केवळ समस्या नाही, तर ती शरीरातील स्ट्रेस लेव्हल वाढवते आणि आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. म्हणून दररोज पुरेसे पाणी प्या आणि तुमच्या शरीराला स्ट्रेसपासून दूर ठेवा.

 

टॅग्स : पाणीहेल्थ टिप्सआरोग्य