Join us

बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:43 IST

सकाळी उठल्यावर पाणी प्या, दर काही तासांनी थोडं थोडं पाणी प्या असा सल्ला निरोगी आरोग्यासाठी नेहमीच दिला जातो. पण काही लोकांसाठी पाणी हे विष ठरत आहे.

लहानपणापासून आपण पाणी हे जीवन आहे असं म्हणतो. सकाळी उठल्यावर पाणी प्या, दर काही तासांनी थोडं थोडं पाणी प्या असा सल्ला निरोगी आरोग्यासाठी नेहमीच दिला जातो. पण काही लोकांसाठी पाणी हे विष ठरत आहे. त्यामुळे जास्त पाणी प्यायल्याने शरीराचं संतुलन बिघडू शकतं आणि ते जीवघेणं देखील ठरू शकतं. 

कोणता आहे हा आजार?

याला Hyponatremia असं म्हणतात, ज्यामध्ये शरीरातील सोडियमची पातळी असामान्यपणे कमी होते. शरीरातील द्रव संतुलन आणि स्नायूंच्या कार्यासाठी सोडियम आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पिता तेव्हा शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं, परंतु सोडियम पातळ होऊन कमी होतं. यामुळे सूज येऊ शकते, विशेषतः मेंदूच्या पेशींना त्याचा फटका बसतो, जे धोकादायक ठरू शकतं. Hyponatremia झालेल्या लोकांसाठी पाणी विष ठरत आहे. 

हायपोनेट्रेमियाची लक्षणं

- सतत थकवा जाणवणं.

- मळमळ किंवा उलट्या

- डोकेदुखी किंवा चक्कर येणं

- स्नायू दुखणं

- जास्त घाम येणे आणि अशक्तपणा येणं

- बेशुद्ध होणं किंवा कोमात जाणं

काय केलं पाहिजे?

- तहान लागल्यावर पाणी प्या.

- एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका, तर दिवसभर थोडं थोडं प्या.

- जर तुम्ही खेळ खेळत असाल तर तुम्ही ओआरएस, लिंबू पाणी, नारळ पाणी घेऊ शकता.

- किडनी किंवा हृदयरोग्यांच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पाणी प्यावं.

पाणी हे जीवन असलं तरी काही परिस्थितींमध्ये ते जीवघेणं देखील ठरू शकतं. आपण आपलं आरोग्य आणि शारीरिक गरजा समजून घेणं महत्त्वाचं आहे. निष्काळजीपणामुळे आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही असं करणं तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतं.  

टॅग्स : आरोग्यपाणीहेल्थ टिप्स