Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > संशोधनाचा दावा, कंबरेचा घेर सांगतो हार्ट ॲटॅक येण्याचा धोका, मोजा तुमची कंबर आहे किती...

संशोधनाचा दावा, कंबरेचा घेर सांगतो हार्ट ॲटॅक येण्याचा धोका, मोजा तुमची कंबर आहे किती...

Waist Size Can Predict Heart Failure Risk New Study Reveals : Your waist size matters. Study says, it can predict heart failure : Waist and height measurements predict heart failure risk better than BMI : Waist to height ratio emerges as strong predictor of heart failure risk : आपल्या कंबरेचा घेर हृदयाचे आरोग्य कसे आहे ते ठरवतो यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2025 17:00 IST2025-06-06T14:24:23+5:302025-06-07T17:00:21+5:30

Waist Size Can Predict Heart Failure Risk New Study Reveals : Your waist size matters. Study says, it can predict heart failure : Waist and height measurements predict heart failure risk better than BMI : Waist to height ratio emerges as strong predictor of heart failure risk : आपल्या कंबरेचा घेर हृदयाचे आरोग्य कसे आहे ते ठरवतो यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात.

Waist Size Can Predict Heart Failure Risk New Study Reveals Waist to height ratio emerges as strong predictor of heart failure risk Waist and height measurements predict heart failure risk better than BMI | संशोधनाचा दावा, कंबरेचा घेर सांगतो हार्ट ॲटॅक येण्याचा धोका, मोजा तुमची कंबर आहे किती...

संशोधनाचा दावा, कंबरेचा घेर सांगतो हार्ट ॲटॅक येण्याचा धोका, मोजा तुमची कंबर आहे किती...

सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये, चुकीचे खाणेपिणे, व्यायामाचा अभाव आणि सततचा तणाव यामुळे वजन वाढीची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आजकाल आपल्यापैकी बरेचजण (Waist Size Can Predict Heart Failure Risk New Study Reveals) वजन वाढीच्या समस्येने हैराण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की जगातील ८ पैकी १ व्यक्ती लठ्ठपणासह जीवन जगत आहे. लठ्ठपणा (Your waist size matters. Study says, it can predict heart failure) हा एक जुनाट गुंतागुंतीची शारीरिक स्थितीत आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर खूप जास्त चरबी जमा होते जी आरोग्य बिघडवू शकते. शरीरात अधिक जास्त प्रमाणात चरबी साठल्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका फार मोठ्या प्रमाणात वाढतो(Waist and height measurements predict heart failure risk better than BMI).

लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर आणि झोपेच्या समस्या यांसारख्या अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. हृदयविकार टाळायचा असेल तर तुमचं वजन किती आहे हे महत्त्वाचं आहेच, पण त्याहूनही जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कंबरेचा घेर किती आहे. नवीन संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की कंबरेचा घेर हा हृदयविकाराच्या (Waist to height ratio emerges as strong predictor of heart failure risk) धोक्याचा एक अतिशय महत्वाचा असा संकेत आहे. आपल्या कंबरेचा घेर आपल्या हृदयाचे आरोग्य कसे आहे ते ठरवतो यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात. 

कंबरेचा घेर सांगतो हृदयविकाराच्या धोक्याचे पूर्वसंकेत... 

स्वीडनमधील लुंड विद्यापीठातील संशोधकांना असे आढळून आले आहे की शरीरातील चरबीचे प्रमाण विशेषतः कंबरेभोवती साचलेली चरबी , हे शरीराच्या एकूण वजनाच्या तुलनेत हृदयाच्या आरोग्यावर अधिक प्रभाव टाकते. या अभ्यासाचे निष्कर्ष १८ मे रोजी, बेलग्रेड (सर्बिया) येथे आयोजित युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर करण्यात आले. या अभ्यासातून शास्त्रज्ञांनी बीएमआय (BMI) वर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, शरीरात चरबी कुठे साठते याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असे अधोरेखित केले आहे. 

जिमला न जाताही समीरा रेड्डी इतकी फिट! पाहा, चक्क घरातील वस्तूंनीच कसा करते व्यायाम...

अभ्यासात असं दिसून आलं आहे की आपल्या कंबरेचा घेर आणि आपली उंची यांचे गुणोत्तर (waist-to-height ratio) यांचा आपल्या हृदयाशी BMI पेक्षा अधिक जवळचा संबंध असतो. लुंड विद्यापीठातील प्रमुख डॉ. अमरा जुझिक यांनी यासंदर्भात सांगितलं की, "BMI हे शरीरातील चरबी कशी वितरित होते याचे अचूक मापन करत नाही. याउलट चरबी कुठे साचते हेच ठरवतं की लठ्ठपणा आपल्या अंतर्गत अवयवांवर कसा परिणाम करतो. कंबरेभोवती साचलेली चरबी ही हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक घातक असते."

व्यायामाला वेळ नाही? महिलांनो, 'या' ३ पद्धतीने रोज चाला-लोक विचारतील वजन कमी करण्याचं सिक्रेट...

कंबरेचा घेर नेमका किती असावा ? 

हृदय निरोगी ठेवण्यासाठी कंबरेचा घेर नेमका किती असावा, हे स्पष्ट करताना अभ्यासाचे सह-लेखक डॉ. जॉन मोल्विन यांनी सांगितले आहे की, तुमच्या उंचीच्या अर्ध्यापेक्षा कमी कंबर असणं हे हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने आदर्श मानलं जातं. उदाहरणार्थ, जर तुमची उंची १७० सेंटीमीटर असेल, तर तुमची कंबर ८५ सेंटीमीटरपेक्षा कमी असणं योग्य आहे.

Web Title: Waist Size Can Predict Heart Failure Risk New Study Reveals Waist to height ratio emerges as strong predictor of heart failure risk Waist and height measurements predict heart failure risk better than BMI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.