Join us

व्हिटामीन के चा खजिना आहेत हे व्हेज पदार्थ; रोज खा, कधीच व्हिटामीन्सची कमतरता होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 12:14 IST

Vitamin K Health benefits, daily intake, and sources : व्हिटामीन के मध्ये अशी पोषक तत्व असतात जी डायबिटीच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.

शरीराच्या सुरळीत कार्यासाठी व्हिटामीन्सची आवश्यकता असते.(Vitamin K Everything You Need to Know) व्हिटामीन्सची कमतरता सामान्य मानली जाते. वास्तविक कोणत्याही वयाच्या व्यक्तीमध्ये हे होऊ शकते. जर शरीरात जीवनसत्त्वांची थोडी फार कमतरता असेल तर त्याचे कोणतेही गंभीर परिणाम होत नाहीत.  (Vitamin K Health benefits, daily intake, and sources)

व्हिटामीन के मध्ये अशी पोषक तत्व असतात जी डायबिटीच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. पालेभाज्या, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राऊट्स, कोबी शतावरी यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर व्हिटामीन के असतात. ज्यामुळे डायबिटीससारख्या गंभीर आजारापासूनही बचाव होऊ शकतो. 

व्हिटामीन्समध्ये डायटरी फायबर्स असतात.  हे इंफ्लमेटरी रेस्पॉन्स कमी करतात आणि हाडांचे चयापचन,  हार्ट अटॅक,  स्ट्रोक, पेरिफेरल डिसिज,  कॅन्सर उद्भवण्यापासून रोखतात. वैज्ञानिकांच्यामते व्हिटामीन के ग्लूटामिक एसिडच्या गामा कार्बोक्सिलेशनसाठी गरजेचे असतात.

पोट, मांड्याचा आकार वाढत चाललाय? रोज फक्त ३ गोष्टी करा, वजन होईल कमी-दिसाल मेंटेन

रक्ताभिसरणासाठी व्हिटॅमिन के चांगले मानले जाते. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी गॅमा-कार्बोक्सिलेशन प्रतिक्रिया आवश्यक आहे आणि शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या प्रक्रियेत शरीरात इतर कार्ये असू शकतात. पालक, ब्रोकोली, केल, बीटरूट, ब्रुसेल्स स्प्राउट्स, रेड कॅबेज, मोहरी हिरव्या भाज्या, फुलकोबी या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. मनुका, एवोकॅडो, किवी, अंजीर, डाळिंब, द्राक्ष, ब्लॅकबेरीज, ब्लूबेरी, टोमॅटो हे पदार्थ खायलाच हवेत.

अन्नातूनच मानवी शरीराला पोषक तत्वे मिळतात. अशा स्थितीत उच्च दर्जाचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी संतुलित राहते. त्याच वेळी, जेव्हा शरीराला पौष्टिक अन्न मिळत नाही. तेव्हा जीवनसत्त्वांची कमतरता होऊ शकते. कधीकधी आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे कुपोषण देखील होऊ शकते. एखाद्या व्यक्तीचे वय  जास्त दिसणं हे देखील जीवनसत्वाच्या कमतरतेचे कारण असू शकते.

व्हिटॅमिनच्या कमतरतेचा धोका गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला आणि लहान मुलांमध्ये सर्वाधिक असू शकतो. आहारात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन के-युक्त पदार्थांचा अभाव, शरीरात व्हिटॅमिन केचे कमी शोषण, यकृत, आतड्यांसंबंधी जळजळ आणि फुफ्फुसांशी संबंधित रोगांमुळे या व्हिटामिन्सचे प्रमाण कमी होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स