Join us

‘ही’ ५ लक्षणंच सांगतात, शरीरात व्हिटामीन बी-१२ कमी झालंय; लगेच आहार बदला, लवकर करा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:14 IST

Vitamin B-12 Deficiency Symptoms : शरीरात व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे झिनझिण्या येणं, कमकुवतपणाची समस्या उद्भवते.

शरीर निरोगी राहण्यासाठी व्हिटामीन्स, फायबर्स, मिनरल्स सारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीरात मोठे बदल दिसून येतात. व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी अत्यंत गरजेचे असते. व्हिटामीन बी-१२ शरीरातील लाल रक्त  पेशींच्या निर्माणापासून ते तंत्रिका तंत्र मजबूत बनवण्यास फायदेशीर ठरते. शरीरात व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे झिनझिण्या येणं, कमकुवतपणाची समस्या उद्भवते. शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. (Muscles Cramps To Tiredness These 5 Vitamin B-12 Deficiency Symptom)

थकवा

रात्रीच्यावेळी तुम्हाला जास्त काम केल्याशिवाय थकवा येत असेल आणि कमकुवतपणा जाणवत असेल तर शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता असू शकते. कारण व्हिटामीन बी-१२ रेड ब्लड सेल्सचे निर्माण करते. ज्यामुळे संपूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळते. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे ऑक्सिजनची कमतरता भासते. ज्यामुळे कमकुवतपणा आणि थकवा जाणवतो. 

हात पायांमध्ये झिनझिण्या येणं

शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास  हाता-पायांमध्ये झिनझिण्या येतात. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पेशींवर चुकीचा परीणाम करते. ज्यामुळे हात-पायांमध्ये झिनझिण्या येण्याची समस्या उद्भवू शकते. 

डोकेदुखी

जर तुम्हाला रोज रात्रीच्यावेळी डोकेदुखीची समस्या उद्भवत असेल तर व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेचं लक्षण असू शकते. डोकेदुखी होण्याची अनेक कारणं असू शकतात. डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही या लक्षणांबाबत सांगू शकता. योग्य पद्धतीनं उपाय केल्यास तुमची समस्या दूर होईल.

झोपेची समस्या

जर रात्री तुमची झोप सतत उडत असेल तर व्हिटामीन बी-१२ ची कमतरता असू शकते. व्हिटामीन बी-१२ मेलाटोनिन प्रोडक्शन वाढवते ज्यामुळे झोपेची समस्या नियंत्रणात येण्यात येते. 

बोरन्हाण विशेष सोप्या मस्त रांगोळ्या; १० नवीन डिजाईन्स

स्मरणशक्ती कमी होते

व्हिटामीन -बी-१२ ची कमतरता भासल्यास स्मरणशक्ती कमी होते. व्हिाटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे विचार करण्यात त्रास होतो. एकाग्रता कमी होते, अशावेळी त्वरीत डॉक्टरांकडे जायला हवं.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स