आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याची अनियमितता, शरीरात पोषक तत्वांची कमतरता असणं खूपच कॉमन झालं आहे. व्हिटामीन बी-१२ एक असं तत्व आहे. जे डिएनए तयार करण्यासाठी आणि शरीरातील पेशींना ऊर्जा देण्यासाठी मदत करते (Eat These Dal in Diet to Get Vitamin B-12). शरीरात व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेनं शरीरात रक्त कमी होणं, थकवा, कमकुवतपणा अशी लक्षणं उद्भवतात. खासकरून शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दिसून येते. कारण व्हिटामीन बी-१२ मुख्यत्वे मांसाहारी पदार्थांमध्ये दिसून येते. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी सप्लिमेंट्सचा आधार घ्यावा लागतो. (Vitamin B-12 Deficiency Foods)
रोजच्या आहारात डाळीचा समावेश करून तुम्ही व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भरून काढू शकता. जेवणात डाळी खाल्ल्यानं फक्त अन्नाला चव येत नाही तर तब्येत चांगली राहण्यासही मदत होते. कोणत्या डाळींचा आहारात समावेश केल्यास व्हिटामीन बी-१२ मिळते ते समजून घेऊ. (Foods For Vitamin B-12)व्हिटामीन बी-१२ शरीर स्वत बनवत नाही. यासाठी अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा लागतो ज्यातून व्हिटामीन बी-१२ भरभरून मिळेल.
चण्याची डाळ भारतीय स्वंयपाक घरात वापरली जाणारी एक पौष्टीक डाळ आहे. यात प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स मोठ्या प्रमाणात असतात. जेव्हा ही डाळ आंबवली जाते जसं की ढोकळा किंवा इडली बनवण्यासाठी डाळ आंबवतात. तेव्हा यात व्हिटामीन बी-१२ सारखे कंम्पाऊंड्स तयार होतात. शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे (Ref). चण्याच्या डाळीशिवाय मुगाची डाळ सुद्धा व्हिटामीन बी-१२ मिळवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. मुगाच्या डाळीत बरीच पोषक तत्व असतात. रोज तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण किंवा सूपच्या स्वरूपात या डाळीचा आहारात समावेश करु शकता.
या डाळीचे सेवन कशाप्रकारे करावे?
चण्याची डाळ भिजवून त्याची भाजी बनवून खाऊ शकता.
मोड आलेल्या चण्यांचं सॅलेड बनवून खाऊ शकता.
चणा डाळीपासून बनवलेला ढोकळा किंवा डोसा आंबवलेल्या पीठाचा असेल तर व्हिटामीन बी-१२ वाढण्यास मदत होते.
चण्याच्या डाळीचं सूप किंवा खिचडीमधूनही पोषण मिळते.
व्हिटामीन बी-12 साठी काय खावे?
दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. यामुळे बॅलेन्स डाएटमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करायला हवा. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यायसाठी फॉर्टिफाईड फुड्सचा आहारात समावेश करा. चण्याच्या डाळीव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या डाळींचा आहारात समावेश करा.