Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हळद दूधात घालून प्यावी की पाण्यात? पाहा, कशाने शरीराला मिळते दुप्पट ताकद

हळद दूधात घालून प्यावी की पाण्यात? पाहा, कशाने शरीराला मिळते दुप्पट ताकद

Turmeric water versus turmeric milk: Which one is healthier : हळदीचे पाणी की हळदीचे दूध? आरोग्यासाठी नक्की योग्य काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2024 03:39 PM2024-05-22T15:39:34+5:302024-05-22T21:48:28+5:30

Turmeric water versus turmeric milk: Which one is healthier : हळदीचे पाणी की हळदीचे दूध? आरोग्यासाठी नक्की योग्य काय?

Turmeric water versus turmeric milk: Which one is healthier? | हळद दूधात घालून प्यावी की पाण्यात? पाहा, कशाने शरीराला मिळते दुप्पट ताकद

हळद दूधात घालून प्यावी की पाण्यात? पाहा, कशाने शरीराला मिळते दुप्पट ताकद

भारतीय संस्कृतीमध्ये हळदीला अनन्यसाधारण महत्व आहे (Turmeric). हजारो वर्षांपासून हळद हे भारतीय खाद्यपदार्थाचे प्रमुख पदार्थ आहे. हळद फक्त पदार्थाची चव वाढवत नाही (Health Benefits). तर, आरोग्य, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. हळदीचा मुख्य सक्रिय घटक कर्क्यूमिन आहे. जे आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. काही जण पदार्थात समावेश करण्याव्यतिरिक्त दुधात किंवा पाण्यात मिसळून पितात. पण मग असा प्रश्न निर्माण होतो की, हळद नेमकी पाण्यात घालून प्यावी की दुधात? हळद कशात घालून प्यायल्याने आरोग्याला फायदा होईल?

यासंदर्भात, आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल सांगतात, 'शरीरावर दोन्हीचे फायदे, तोटे आणि परिणाम काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. या दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे'(Turmeric water versus turmeric milk: Which one is healthier?).

हळदीचे पाणी

हळदीचे पाणी बनवण्यासाठी हळद पावडर फक्त पाण्यात मिसळायला लागते. हळदीमध्ये आढळणारा मुख्य घटक कर्क्यूमिन आहे, जो मजबूत अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. नियमितपणे हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते, रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला उर्जा मिळते.

पायांच्या तळव्यांची जळजळ होते? ५ घरगुती उपाय - पायांची आग होईल बंद लवकर

हळदीचे पाणी प्यायल्याने शरीराला किती पोषक तत्वे मिळतात?

हळदीतील कर्क्यूमिन फायदेशीर आहे, परंतु हळद फक्त खाल्ल्याने शरीर ते पूर्णपणे शोषत नाही. हळद पाण्यात विरघळत नाही. ते थेट पचनमार्गातून बाहेर टाकला जाऊ शकतो. हळदीच्या पाण्यात काळी मिरी मिसळल्याने कर्क्युमिनचे शोषण वाढू शकते. कारण काळी मिरीमध्ये पाइपरिन नावाचे तत्व आढळते, जे शरीरात कर्क्यूमिनचे शोषण सुधारते.

हळदीचे दूध शरीरासाठी किती फायदेशीर?

हळदीच्या दुधाला सोनेरी दूध असेही म्हणतात. दुधात हळद आणि इतर मसाले जसे आले, दालचिनी आणि काळी मिरी घालून तयार केली जाते. दुधात फॅट असते, जे कर्क्यूमिन शोषण्यास मदत करते. कर्क्युमिन हे चरबीमध्ये विरघळणारे असते, याचा अर्थ ते चरबीसोबत सेवन केल्यावर शरीरात चांगले शोषले जाते. म्हणून, हळदीचे दूध हळदीच्या पाण्याच्या तुलनेत कर्क्यूमिनचे चांगले शोषण, यासह आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

दुपारचं जेवणानंतर '५' गोष्टी न चुकता कराच; व्यायाम न करताही पोट होईल सपाट- वजनही घटेल

हळदीचे दूध हे पोषक तत्वांचा खजिना

दूध हे प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह आवश्यक पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे. दुधात हळद घालून प्यायल्याने पोषक तत्वांसह शरीराला पोषणही मिळेल. हळदीच्या दुधात वापरलेले अतिरिक्त मसाले, जसे आले, दालचिनी आणि काळी मिरी, यातूनही आरोग्याला पौष्टीक घटक मिळतात.

हळदीचे पाणी की हळदीचे दूध - आरोग्यासाठी काय चांगले?

हळदीचे पाणी आणि हळदीचे दूध दोन्ही फायदेशीर आहेत, परंतु हळदीचे दूध हे अधिक फायदेशीर मानले जाते. याचे कारण म्हणजे यामध्ये कर्क्युमिनचे शोषण चांगले होते, दुधात भरपूर पोषक असतात आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या इतर मसाल्यांचेही भरपूर फायदे आहेत. 

Web Title: Turmeric water versus turmeric milk: Which one is healthier?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.