Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > १ ग्लास पाण्यात चिमूटभर हळद घालून प्या; दूध-हळद पिण्यापेक्षा हे पाणी जास्त फायद्याचं

१ ग्लास पाण्यात चिमूटभर हळद घालून प्या; दूध-हळद पिण्यापेक्षा हे पाणी जास्त फायद्याचं

Turmeric Water Benefits (Haldicha Pani Pinyache Fayde) : हळद औषधी गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे हळदीच्या सेवनानं फक्त इम्युनिटी वाढत नाही तर पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:36 IST2026-04-06T15:35:07+5:302026-04-06T15:36:51+5:30

Turmeric Water Benefits (Haldicha Pani Pinyache Fayde) : हळद औषधी गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे हळदीच्या सेवनानं फक्त इम्युनिटी वाढत नाही तर पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते

Turmeric Water Benefits : Drink One Glass Of Turmeric Water Get Amazing Benefits | १ ग्लास पाण्यात चिमूटभर हळद घालून प्या; दूध-हळद पिण्यापेक्षा हे पाणी जास्त फायद्याचं

१ ग्लास पाण्यात चिमूटभर हळद घालून प्या; दूध-हळद पिण्यापेक्षा हे पाणी जास्त फायद्याचं

आजकाल लोक आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर करत आहेत. त्यातीलच एक म्हणजे हळदीचं पाणी पिणं. हळद औषधी गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे हळदीच्या सेवनानं फक्त इम्युनिटी वाढत नाही तर पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते तसंच त्वचा ग्लोईंग दिसते. जर योग्यवेळी योग्य पद्धतीनं हळदीच्या पाण्याचे सेवन केले तर तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. एक ग्लास हळदीचे पाणी प्यायल्यानं तब्येतीत बरेच चांगले बदल दिसून येतात. (Drink One Glass Of Turmeric Water Get Amazing Benefits)

हळदीचं पाणी प्यायल्यानं शरीराला काय फायदे मिळतात?

 हळदीच्या वापरानं रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. यात एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे शरीराला फ्री रेडीकल्सपासून होणारं नुकसान टाळतात. नियमित स्वरूपात हळदीचं पाणी प्यायल्यानं रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. ज्यामुळे संक्रमणाचा धोका उद्भवत नाही. नियमित हळदीचं पाणी प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते. शरीरातील गॅस कमी करण्यास मदत होते. यातील एंटी इंफ्लेमेटरी गुण पचन सुधारण्यास मदत करतात.

माऊथ कॅन्सरची सुरुवातीची ७ लक्षणं; सतत तोंड येतं म्हणत दुर्लक्ष करणंही पडू शकतं महागात

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडीसिनच्या रिपोर्टनुसार हळदीत करर्क्युमिन नावाचे कम्पाऊंड असते. यात शक्तीशाली एंटी इन्फ्लामेटरी गुण असतात. नियमित  स्वरूपात हळदीचं पाणी प्यायल्यानं शरीराची सूज कमी होते. ज्यामुळे आजारांना रोखणं सोपं होतं.करर्क्युमिन शरीराची जूनाट सूजही कमी होते (Ref).  ज्यामुळे शरीर चांगलं राहतं. हळदीचे पाणी रक्ताभिसारण सुधारण्यास आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर ठरते. एका अभ्यासानुसार हळदीचे नियमित सेवन केल्यानं अल्झायमर आणि डिप्रेशन यांसारख्या समस्या रोखण्यासही मदत होते. 

 नियमित हळदीचं पाणी प्यायल्यानं हृदय रोगाचा धोका कमी होतो. हळदीचं पाणी प्यायल्यानं शरीराला बरेच  फायदे मिळतात. जर तुम्हाला तब्येतीसंबंधित कोणतीही समस्या असेल तर आहारात हळदीचा समावेश  करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

हळदीचं पाणी कधी, कसे प्यावं?

सकाळी रिकाम्या पोटी हळदीचं पाणी प्यायल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. ज्यामुळे शरीर आतून हील होण्यास मदत होते. १ ग्लास कोमट पाणी घ्या. यात पाव चमचा हळद  घाला किंवा कच्च्या हळदीचा रस मिसळा नंतर हे पाणी कोमट  करून प्या.

Web Title : बेहतर स्वास्थ्य के लिए हल्दी का पानी पिएं; हल्दी दूध से ज़्यादा फ़ायदेमंद।

Web Summary : हल्दी का पानी प्रतिरक्षा, पाचन और त्वचा के स्वास्थ्य को बढ़ाता है। इसके एंटी-इंफ्लेमेटरी गुण और एंटीऑक्सिडेंट बीमारियों से बचाते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए इसे खाली पेट पिएं।

Web Title : Drink turmeric water for better health; more beneficial than turmeric milk.

Web Summary : Turmeric water boosts immunity, digestion, and skin health. Its anti-inflammatory properties and antioxidants protect against diseases. Drink it on an empty stomach for best results.