प्रोटीन (Protein) व्हेज अन्नातून मिळत नाही असा बऱ्याचजणांचा गैरसमज असतो. प्रोटीनसाठी जास्त पैसे खर्च न करता कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही चांगले पदार्थ खाऊ शकता (Top Veg Protein Source). शेंगदाण्याला गरिबांचा बदाम म्हणून ओळखले जाते. पण यातील पौष्टीक घटकांचा विचार केल्यास ते कोणत्याही महागड्या सुक्या मेव्यापेक्षा कमी नाहीत. विशेषत:प्रोटीन्सच्या बाबतीत शेंगदाणे हे परवडणारा पॉवरहाऊस आहेत. (Peanuts Powerhouse Of Protein Eating 100 Grams Of Peanuts Daily)
हिवाळ्याच्या दिवसांत सांधेदुखीची समस्या उद्भवते.अशावेळी काहीतरी पौष्टीक गरम पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. शेंगदाणे बऱ्याच लोकांना खायला आवडतात. हिवाळ्याच्या दिवसांत शेंगदाणे खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. रोज 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यानं शरीरात काय काय बदल होतात समजून घेऊ.
शेंगदाणे प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो त्याची कारणं खालीलप्रमाणे आहेत. १०० ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये अंदाजे २५ ग्रॅम पेक्षा जास्त प्रथिनं असतात. हे प्रमाण अनेक मांसाहारी पदार्थांपेक्षा किंवा इतर महागड्या सुक्या मेव्यांपेक्षा जास्त आहे. शेंगदाणे वनस्पती आधारीत प्रथिनांचा एक स्वस्त आणि उत्तम पर्याय आहेत. विशेषत:शाकाहारी आणि व्हिगन आहार घेणाऱ्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे.
पोहे गचगचीत होतात तर कधी वातड लागतात? ७ टिप्स, मऊ-मोकळे चवदार पोहे होतील घरीच
प्रथिनं शरीरातील स्नायू तयार करण्यासाठी आणि त्यांची दुरूस्ती करण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे शेंगदाणे व्यायाम करणाऱ्यांसाठी आणि वाढत्या वयाच्या मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत. प्रथिनांमुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही तसंच वजन नियंत्रणात राहतं.
आरोग्यदायी चरबी-यात मोनोअनसॅच्युरेडेट आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात तसंच खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई, लोह, फोलेट, मॅग्नेशियम आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे शरीराल तंदरूस्त ठेवतात आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. (Ref)
घरात बोअरींग गाऊन घालणं विसरा; १० कॉटनचे नाईट सूट्स, मॅक्सी घेता तेवढ्याच पैशात घ्या सुट्स
गरिबांचे बदाम म्हणून ओळखले जाणारे शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवतात आणि मेंदूचे कार्य सुधारतात. रोज १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यानं स्मरणशक्ती चांगली राहते. शेंगदाण्यांमध्ये ओमेगा-६ फॅटी एसिड्स असतात ज्यामुळे मेंदूच्या नसा मजबूत होण्यास मदत होते. रोज १०० ग्रॅम शेंगदाण्यांचे सेवन केल्यास तुम्हाला प्रोटीन, ओमेगा-३ आणि ओमेगा ६ फॅटी एसिड, फायबर्स, व्हिटामीन, खनिजं यांसारखी पोषक तत्व मिळतील.
