रोज सकाळी पोट साफ न होणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. जर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टिम व्यवस्थित काम करत असेल तर गट हेल्थ हेल्दी राहते. (Things To Do In Bed To Induce Pressure And Help You Poop How To Make You Feel Poop) पण पाेट साफ होत नसेल तर तो काळजीचा विषय. तब्येत बिघडतेच.
सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नसेल किंवा तुमची पचनक्रिया चांगली नसेल तर ओव्हरऑल आरोग्यावर याचा परिणाम होतो. डाएटमध्ये बदल, फिजिकल एक्टिव्हीटी करून तुम्ही पोट सहज साफ ठेवू शकता. योग एक्सपर्ट नताशा कपूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
मुलांनी आपल्याशी कायम आदरानं बोलावं असं वाटतं? आईबाबांनी आधी स्वत: बदलायला हव्या ६ सवयी
१ उपाय करा
एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार झोपण्यासाठी डावी बाजू उत्तम मानली जाते. ज्यामुळे एसिड रिफ्लेक्स कमी होतात आणि पचनक्रिया सुधारते. सकाळी उठून तुम्हाला प्रेशर येत नसेल तर तुम्ही काही वेळ डाव्या कुशीवर झोपा. आपल्या हातांच्या बोटांनी पायांच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ५ ते १० वेळा हे केल्यानं बोटांवर दबाव येईल आणि प्रेशर राहील.
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला प्रेशर येत नसेल तर वज्रासनात बसा. ज्यामुळे पोट साफ होणं सोपं होईल. याशिवाय पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होईल. तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल. पोट साफ होत नसेल तर तुम्ही कोमट पाण्यात तूप मिसळून प्या. तुम्ही मलासनातही बसू शकता. काही वेळातच तुमचं पोट साफ होईल.