Liver Health : लिव्हर आपल्या शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर काढतं, तसेच फॅट आणि शुगरला मेटाबोलाइज करतं. अन्न पचनातही लिव्हरची महत्वाची भूमिका असते. पण आपल्या काही चुकांमुळे किंवा चुकीच्या सवयींमुळे लिव्हरचं नुकसान होतं. खासकरून सकाळी केल्या जाणाऱ्या काही चुकांमुळे लिव्हरचं आरोग्य बिघडतं. चला तर पाहुयात अशा कोणत्या सवयी असतात ज्यामुळे लिव्हरचं नुकसान होतं.
सकाळचा नाश्ता न करणं
बरेच लोक वेळ कमी असल्यानं किंवा डायटिंग करत असल्यानं सकाळचा नाश्ता स्किप करतात. सकाळी लिव्हरला काम करण्यासाठी एनर्जीची गरज असते. जास्त वेळ उपाशी राहिल्यानं शरीरात कोर्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्याचा प्रभाव कुठेना कुठे लिव्हरवरही पडतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता कधीच स्किप करू नये.
हाय शुगर ब्रेकफास्ट
बरेच लोक नाश्त्यात गोड काहीतरी खातात. बरेचजण टोस्टवर जॅम लावून खतात, माफिन किंवा हेल्दी ग्रेनोला घेतात. या गोष्टी लिव्हरसाठी अजिबात चांगल्या नाहीत. यात आढळणारी शुगर खासकरून फ्रूक्टोज लिव्हरमध्ये मेटाबॉलाइज होते, ज्यामुळे पुढे जाऊन लिव्हरमध्ये फॅट जमा होण्याचा धोका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात शुगर कमी असावी आणि प्रोटीन व फायबर जास्त असावे.
उपाशीपोटी सप्लीमेंट
अनेक लोक सकाळी लक्षात ठेवत नाही की, त्यांनी नाश्ता केला की नाही आणि असेच सप्लीमेंट किंवा पेनकिलर घेतात. काळानुसार याचा प्रभाव त्यांच्या लिव्हरवर पडतो. चुकीच्या सप्लीमेंटमुळे लिव्हर डिटॉक्सचं काम योग्यपणे करू शकत नाही. अशात सप्लीमेंट तेव्हाच घ्या जेव्हा गरज आहे आणि काहीतरी खाल्ल्यावरच घ्या.
सकाळी व्यायाम टाळणे
सकाळी कुणाकडे फारसा वेळ नसतो. अशात बरेच लोक सकाळी व्यायाम करत नाही. पण सकाळी थोडा वेळ काढून हलका व्यायाम किंवा वॉक केल्यास लिव्हर हेल्दी राहतं. जर झोपेतून उठल्यावर तुम्ही सतत बसून राहत असाल तर यानं मेटाबॉलिज्म स्लो होतं. ज्याचा प्रभाव लिव्हरवर पडतो.
जास्त डिटॉक्स ड्रिंक
बरेच लोक बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी जास्त डिटॉक्स ड्रिंक घेतात. जे लिव्हरसाठी अजिबात चांगलं नाही. काही लोक अॅपल सायडर व्हिनेगर, लाल मिरची, लिंबू, हळद आणि लसूण असे वेगवेगले डिटॉक्स उपाय करतात. हे जास्त घेणं नुकसानकारक ठरू शकतं. साधं लिंबू पाणी किंवा साधा कोरफडीचा ज्यूस पिऊनही बॉडी डिटॉक्स करू शकता.