Kidney Problem Signs : किडनी शरारीतील विषारी तत्व लघवीद्वारे बाहेर फिल्टर करून बाहेर काढण्याचं करतात. इतकंच नाही तर शरीरातील रक्त सुद्धा किडनीद्वारे फिल्टर केलं जातं. त्यामुळे किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. म्हणूनच किडनीचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप महत्वाचं ठरतं. जर किडनीमध्ये काही गडबड झाली तर याचा प्रभाव शरीरावर दिसून येतो. सामान्यपणे किडनीमध्ये गडबड झाल्यावर मुख्यपणे सकाळी काही लक्षणे दिसतात. आज आम्ही अशाच पाच लक्षणांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.
लघवीच्या रंगात बदल
सकाळी लघवीचा रंग आणि प्रमाण तुमच्या किडनी हेल्थचा महत्वाचा संकेत होऊ शकतो. जर लघवीचा रंग फार जास्त डार्क पिवळा असेल, लघवीतून फेस तयार होत असेल, पुन्हा पुन्हा लघवी लागत असेल तर हा किडनीच्या समस्येचा संकेत असू शकतो.
थकवा आणि कमजोरी
जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर हा एक गंभीर संकेत असू शकतो. किडनीच्या समस्येमुळे शरीरात टॉक्सिन जमा होऊ लागतात, ज्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर नेहमीच थकवा जाणवतो.
पोटात मुरडा येणे
सकाळी झोपेतून उठल्यावर पोटावर सूज किंवा मुरडा येत असेल तर हा किडनी योग्यपणे काम करत नसल्याचा संकेत असू शकतो. त्यामुळे असं काही वेगळं लक्षण दिसलं तर वेळीच सावध व्हा.
जास्त तहान लागणे
जर सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त तहान लागत असेल, तर हाही एक संकेत असू शकतो. किडनीची समस्या झाल्याने शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे तुम्हाला अधिक तहान लागते.
त्वचेवर खाज
किडनीची समस्या असल्याने शरीरात टॉक्सिन जमा होऊ लागतात. ज्यामुळे त्वचेवर खाज, रॅशेज आणि इतरही समस्या होऊ लागतात. सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला त्वचेवर खास येत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.