Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटात सूज असेल तर दिसतात ३ लक्षणं, पाहा कारणं आणि सूज कमी करण्यासाठी उपाय

पोटात सूज असेल तर दिसतात ३ लक्षणं, पाहा कारणं आणि सूज कमी करण्यासाठी उपाय

Swelling In Stomach Symptoms : अनेकदा काही कारणांनी सूज आल्यावर शरीरात कोणती लक्षणं दिसतात हे जाणून घेऊ. वेळीच मोठा धोका टाळता येईल. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:21 IST2026-04-06T11:29:21+5:302026-04-06T14:21:47+5:30

Swelling In Stomach Symptoms : अनेकदा काही कारणांनी सूज आल्यावर शरीरात कोणती लक्षणं दिसतात हे जाणून घेऊ. वेळीच मोठा धोका टाळता येईल. 

These are the abdominal swelling symptoms in the stomach | पोटात सूज असेल तर दिसतात ३ लक्षणं, पाहा कारणं आणि सूज कमी करण्यासाठी उपाय

पोटात सूज असेल तर दिसतात ३ लक्षणं, पाहा कारणं आणि सूज कमी करण्यासाठी उपाय

Swelling In Stomach Symptoms : पोट हे सगळ्या आजारांचं मूळ असतं असं म्हणतात. कारण जास्तीत जास्त आजार हे पोटातूनच सुरू होतात. त्यामुळे पोटाची योग्य ती काळजी घेणं फार महत्वाचं ठरतं. पोटात छोटी आणि मोठी आतडी असते. छोटी आतडी अन्न पचन करते आणि पोषक तत्व शोषून घेते. तेच मोठी आतडी पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स पूर्ण शरीरात पोहोचवण्याचं आणि वेस्ट एकत्र करण्याचं काम करते. दोन्ही आतडी मिळून पोट आणि पूर्ण शरीराला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. पण अनेकदा काही कारणांनी आतडींमध्ये सूज येते. ज्यामुळे त्यांचं काम प्रभावित होतं. अशात सूज आल्यावर शरीरात कोणती लक्षणं दिसतात हे जाणून घेऊ. जेणेकरून वेळीच मोठा धोका टाळता येईल. 

पोट आणि आतडीमध्ये सूजेची लक्षणं

फार जास्त आणि नेहमीच गॅस तयार होणे 

अपचनाची समस्या होणे 

पोट फुगणे किंवा अॅसिडिटी 

पोटात दुखणे किंवा मुरडा येणे 

पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाण्याची इच्छा

वजन कमी होणे

उलटी आल्यासारखं वाटणे

आतड्यांची सूज कशी कमी होईल?

दही आणि ताक

आतड्या हेल्दी ठेवण्यासाठी आहारात प्रोबायोटिक्स असलेलं दही आणि ताकाचा समावेश करा. या गोष्टींनी आतडींमध्ये गुड बॅक्टेरिया वाढतात आणि आतडी हेल्दी राहतात. दही आणि ताक प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटी सुद्धा कमी होते. दोन्ही गोष्टींनी पोटातील अग्नि शांत होते. पोटातील बॅक्टेरिया संतुलित राहता आणि आतडींची स्वच्छताही होते.

कडधान्य 

आहारात कडधान्याचा भरपूर समावेश करा. फायबर असलेल्या गोष्टी खा. डायटरी फायबरने पचन तंत्र सुधारतं. यामुळे पोट सहजपणे साफ होतं आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. गटहेल्थसाठी कडधान्य खूप फायदेशीर असतात. कडधान्यांमध्ये फायबर आणि गुड बॅक्टेरिया असतात जे आतडींचं आरोग्य चांगलं ठेवतात.

कांदा आणि लसूण

कच्चा कांदा आणि लसूण खाल्ल्यानेही पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. कांदा - लसणाने आतडींचं आरोग्य चांगलं राहतं. रोज सकाळी लसणाच्या दोन कच्च्या कळ्या खाव्यात. जेवणासोबत कच्चा कांदा खावा. यानी पोटात गुड बॅक्टेरिया वाढतात आणि बॅड बॅक्टेरिया नष्ट होतात.

हिरव्या भाज्या

जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या भाज्यांनी आतडी हेल्दी ठेवण्यास मदत मिळते. हिरव्या भाज्या खाल्ल्याने पचन व्यवस्थित होतं. तसेच यातून फायबर, प्रीबायोटिक, अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटामिन आणि मिनरल्स शरीराला मिळतात. 

या गोष्टी नियमित खाल्ल्याने पोट आणि आतडींवर आलेली सूज कमी होते. तसेच पोटात गुड बॅक्टेरिया वाढतात. सोबतच भरपूर पाणी प्यावे आणि अन्न बारीक चावून खावे. 

Web Title : पेट में सूजन: लक्षण और सूजन कम करने के आसान उपाय

Web Summary : पेट में सूजन से गैस, अपच और दर्द होता है। दही जैसे प्रोबायोटिक्स, फाइबर युक्त खाद्य पदार्थ, प्याज, लहसुन और हरी सब्जियां सूजन को कम करने और आंत के स्वास्थ्य को बेहतर बनाने में मदद कर सकते हैं। खूब पानी पिएं और भोजन को अच्छी तरह चबाएं।

Web Title : Bloated Stomach: Symptoms and simple remedies for reducing swelling.

Web Summary : Stomach swelling causes gas, indigestion, and pain. Probiotics like yogurt, fiber-rich foods, onions, garlic, and green vegetables can help reduce inflammation and improve gut health. Drink plenty of water and chew food well.