Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लालचुटूक टोमॅटो खाणं ‘या’ ४ आजारांत अत्यंत घातक, आवडतात म्हणून खाल्ले तर थेट दवाखान्यात भरतीच

लालचुटूक टोमॅटो खाणं ‘या’ ४ आजारांत अत्यंत घातक, आवडतात म्हणून खाल्ले तर थेट दवाखान्यात भरतीच

Who Should Avoid Tomatos : काही आजार किंवा मेडिकल कंडीशन्स अशा असतात ज्यात टोमॅटो खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:04 IST2025-07-30T17:03:52+5:302025-07-30T18:04:08+5:30

Who Should Avoid Tomatos : काही आजार किंवा मेडिकल कंडीशन्स अशा असतात ज्यात टोमॅटो खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

These 4 medical conditions people should avoid eating tomatoes | लालचुटूक टोमॅटो खाणं ‘या’ ४ आजारांत अत्यंत घातक, आवडतात म्हणून खाल्ले तर थेट दवाखान्यात भरतीच

लालचुटूक टोमॅटो खाणं ‘या’ ४ आजारांत अत्यंत घातक, आवडतात म्हणून खाल्ले तर थेट दवाखान्यात भरतीच

Who Should Avoid Tomatos : लालेलाल टोमॅटो समोर आले की, खावंसं वाटतं. आंबट, गोड टोमॅटो जवळपास सगळ्यांनाच आवडतात. वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. इतकंच नाही तर बरेच लोक सॅलड म्हणूनही कच्चे टोमॅटो आवडीने घातात. टोमॅटोमध्ये अनेक पोषक तत्व सुद्धा असतात जसे की, व्हिटामिन सी, पोटॅशिअम, फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स. हे तत्व आरोग्यासाठी चांगले असतात. पण इतके पोषक तत्व असूनही काही लोकांसाठी टोमॅटो खाणं धोक्याचं ठरू शकतं. 

काही आजार किंवा मेडिकल कंडीशन्स अशा असतात ज्यात टोमॅटो खाणं नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे टोमॅटो खाणं टाळलं पाहिजे किंवा प्रमाण कमी केलं पाहिजे. अशात कुणासाठी टोमॅटो खाणं नुकसानकारक ठरू शकतं हे पाहुयात.

गॅस्ट्रिक समस्या असलेले लोक

टोमॅटोमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड आणि मॅलिक अ‍ॅसिड असतं. जे पोटात अ‍ॅसिडिटी वाढवू शकतं. ज्या लोकांना गॅस, अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा पोटात जळजळ होण्याची समस्या नेहमीच होते. अशा लोकांनी टोमॅटो कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत किंवा पूर्णपणे बंद केले पाहिजे. इतकंच नाही तर उपाशीपोटी जर टोमॅटो खाल्ले तर ही समस्या अधिक वाढू शकते.

किडनी स्टोन

टोमॅटोमध्ये ऑक्सालेट तत्व असतं. जे कॅल्शिअमसोबत मिळून किडनीमध्ये स्टोन बनवतं. ज्या लोकांना आधीच किडनी स्टोनची समस्या आहे किंवा ज्यांच्या घरात आधी कुणाला ही समस्या झाली असेल अशा लोकांनी सुद्धा जास्त टोमॅटो खाऊ नये. टोमॅटोच्या बिया आणि सालीमध्ये ऑक्सालेटचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे खातही असाल तर बिया नसलेलं खावं.

जॉइंट्समध्ये वेदना

टोमॅटोमधील सोलनिन तत्व जॉइंट्समध्ये सूज आणि वेदना वाढवू शकतं. ज्या लोकांना रूमेटाइड अर्थरायटिस किंवा संधिवात आहेत, त्यांनीही टोमॅटो कमी खावेत. काही केसेसमध्ये टोमॅटो खाल्ल्याने जॉइंट्समध्ये वेदना होऊ शकतात.

अ‍ॅलर्जी किंवा त्वचेसंबंधी समस्या

काही लोकांना टोमॅटोची अ‍ॅलर्जी असू शकते. ज्यामुळे त्यांनी जर टोमॅटो खाल्लं तर खाज, चट्टे, सूज किंवा तोंडात झिणझिण्या अशा समस्या होऊ शकतात. त्याशिवाय टोमॅटोमध्ये हिस्टामाइन तत्व असतं. जे एग्झिमा किंवा डर्मेटाइयटिससारख्या त्वचेसंबंधी समस्या वाढवू शकतात. 

Web Title: These 4 medical conditions people should avoid eating tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.