Obesity In Children : भारतात लठ्ठपणा खूप जास्त वाढतोय, हे सतत हेल्थ एक्सपर्ट सांगत असतात. आता तर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक बजेटच्या पहिल्या सत्रात भारताचं आर्थिक सर्व्हेक्षण २०२५ - २६ सादर केलं. या सर्व्हेक्षणात त्यांनी सुद्धा सांगितलं की, भारतात लठ्ठपणा वेगाने वाढत आहे. भारतात ही समस्या फार गंभीर बनत चालली आहे. यात सगळ्यात चिंतेची बाब ही आहे की, पाच वर्षापेक्षा कमी वयाची लहान मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा. हाच वाढता लठ्ठपणा अनेक गंभीर आजारांचं कारण ठरतो.
लहान मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा
या सर्व्हेनुसार, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये जास्त वजन २०१५ - १६ मध्ये २.१ टक्क्यांहून वाढून २०१९ - २१ मध्ये ३.४ टक्के झालंय. एका अंदाजानुसार, २०२० मध्ये भारतात ३.३ कोटीपेक्षा जास्त मुले लठ्ठ होते आणि २०३५ पर्यंत ही संख्या अंदाजे ८.३ कोटी मुलांमध्ये दिसेल.
२५ टक्के महिला आणि पुरूषांमध्ये लठ्ठपणा
सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे की, लठ्ठपणा सगळ्याच वयोगटातील लोकांची डोकेदुखी ठरत आहे. लठ्ठपणामुळे डायबिटीस, हृदयरोग आणि हायपरटेंशनसारख्या आजारांचा धोका वाढतोय. २०१९ - २१ च्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच हवाला देत, सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे की, २४ टक्के भारतीय महिला आणि २३ टक्के भारतीय पुरूष ओव्हरवेट किंवा लठ्ठ आहेत. १५ - ४९ वयोगटातील महिलांमध्ये ६.४ टक्के लठ्ठपणा आहे आणि पुरूषांमध्ये ४.० टक्के लठ्ठपणा आहे.
लठ्ठपणाची कारणं...
देशात वाढता लठ्ठपणा वाढण्यामागे दुसरं काही नाही तर बिघडलेला आहार हे कारण आहे. खासकरून, गेल्या काही वर्षांमध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. हेच लठ्ठपणाचं मुख्य कारण आहे. भारतात अल्ट्रा प्रोसेस्ड फूडची रिटेल विक्री २००६ मध्ये ०.९ बिलियन डॉलरहून वाढून २०१९ मध्ये जवळपास ३९ बिलियन डॉलर झाली, म्हणजे यात ४-० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इकॉनॉमिक सर्व्हेने देशातील वाढत्या अल्ट्रा प्रोसेस्ड फूड मार्केटबाबत चिंता व्यक्त केली आहे.
लठ्ठपणा कंट्रोल करण्याचे उपाय
पाणी
फिटनेस कोचनं सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी एक ग्लास पाणी प्यायला हवं. सकाळची वेळ आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असते. यावेळी आपण शरीराचं मेटाबॉलिज्म अॅक्टिव करू शकतो, फॅट बर्निंग प्रोसेस सुरू करू शकतो. त्यामुळे सकाळी एक ग्लास पाणी खूप महत्वाचं ठरतं. सकाळी पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, भूक कमी लागते आणि शरीर अॅक्टिव होतं.
व्हिटामिन आणि वॉक
फिटनेस कोचनं सांगितलं की, पाणी प्यायल्यानंतर मी रोज सकाळी शरीरासाठी आवश्यक व्हिटामिन्स घेतो आणि त्यानंतर कमीत कमी २० ते ३० मिनिटं पायी चालतो. योग्य व्हिटामिन्स घेतल्यानं शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि एनर्जी वाढते. त्यानंतर सकाळी पायी चालल्यानं फॅट बर्न होतात, मन शांत होतं आणि सूर्याच्या किरणांनी मूडही चांगला राहतो.
नाश्त्यात ३० ग्रॅम प्रोटीन
लठ्ठपणा कमी करायचा असेल तर सकाळचा नाश्ता तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. फिटनेस कोच म्हणाला की, नाश्त्यात कमीत कमी ३० ग्रॅम प्रोटीन असायला हवं. प्रोटीन खाल्ल्यानं पोट भरलेलं राहतं, दिवसभर भूक कमी लागते आणि एनर्जी सुद्धा कायम राहते. प्रोटीनमुळे कॅलरी बर्न होण्याची प्रोसेस अधिक वेगानं होते. ज्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी कमी होते.
वर्कआउट - मेडिटेशन
स्ट्रेस, तणाव या समस्यांमुळे वजन वाढतं. पोटावर चरबी जमा होते. अशात स्ट्रेस दूर करण्यासाठी मेडिटेशन करू शकता. यानं मन शांत होतं आणि स्ट्रेस कमी होतो. वजन कमी करण्यात या गोष्टीची खूप महत्वाची भूमिका असते. त्यामुळे रोज किमान ५ ते १० मिनिटं मेडिटेशन करा. तसेच रोज वर्कआउटही करा.
Web Summary : India faces a growing obesity crisis, especially among children under five. The Economic Survey highlights rising obesity linked to ultra-processed foods. Experts recommend hydration, vitamins, exercise, protein-rich breakfasts, and stress management to combat this alarming trend.
Web Summary : भारत में मोटापा बढ़ रहा है, खासकर पांच साल से कम उम्र के बच्चों में। आर्थिक सर्वेक्षण में अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्य पदार्थों से जुड़े मोटापे पर प्रकाश डाला गया है। विशेषज्ञ जलयोजन, विटामिन, व्यायाम, प्रोटीन युक्त नाश्ता और तनाव प्रबंधन की सलाह देते हैं।