lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज 'या' वेळेत फक्त १० मिनिटं उन्हात बसा; व्हिटामीन-D भरपूर मिळेल, आजार राहतील दूर

रोज 'या' वेळेत फक्त १० मिनिटं उन्हात बसा; व्हिटामीन-D भरपूर मिळेल, आजार राहतील दूर

The Right Way to Get Vitamin D From the Sun : सुर्यप्रकाशामुळे शरीराला व्हिटामीन डी कमतरता भरून काढण्यास मदत होते. सकाळी ८ ते ११ या वेळेत तुम्ही कोवळे ऊन घेऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 08:34 AM2023-11-03T08:34:00+5:302023-11-05T12:30:17+5:30

The Right Way to Get Vitamin D From the Sun : सुर्यप्रकाशामुळे शरीराला व्हिटामीन डी कमतरता भरून काढण्यास मदत होते. सकाळी ८ ते ११ या वेळेत तुम्ही कोवळे ऊन घेऊ शकता.

The Right Way to Get Vitamin D From the Sun : What is the Best Time to Get Vitamin D | रोज 'या' वेळेत फक्त १० मिनिटं उन्हात बसा; व्हिटामीन-D भरपूर मिळेल, आजार राहतील दूर

रोज 'या' वेळेत फक्त १० मिनिटं उन्हात बसा; व्हिटामीन-D भरपूर मिळेल, आजार राहतील दूर

शरीरात व्हिटामीन डी (Vitamin D) कमतरता पूर्ण करण्यासाठी सगळ्यात चांगला स्त्रोत म्हणजे सकाळचं कोवळं ऊन, व्हिटामीन डी ची कमतरता अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकते.(Vitamin D Sources)  हेल्थ एक्सपर्ट्सुद्धा उन्हात बसण्याचा सल्ला देतात. (How to Safely Get Vitamin D From The Sun) व्हिटामीन डी मुळे फक्त हाडं चांगली राहत नाही तर इम्यूनटी,  मांसपेशीसुद्धा कमकुवत होत नाहीत.  पण नक्की कोणत्या वेळी उन्हात बसावे, जेणेकरून व्हिटामीन डी मिळेल हेच बऱ्याचजणांना कळत नाही. (What is the best time for vitamin d from sunlight)

व्हिटामीन डी ची कमतरता कशी पूर्ण करावी? (Right Way to Get Vitamin D From the Sun)

सुर्यप्रकाशामुळे शरीराला व्हिटामीन डी कमतरता भरून काढण्यास मदत होते. सकाळी ८ ते ११ या वेळेत तुम्ही कोवळे ऊन घेऊ शकता. कारण या वेळेत सुर्यप्रकाश फार तीव्र नसतो आणि शरीराला व्हिटामीन डी पुरेश्या प्रमाणात मिळेल. उन्हाळ्याच्या दिवसांत २० ते २५ मिनिटे आणि हिवाळ्यात जवळपास २ तास सनबाथ घेणं फायदेशीर मानलं जाते.  यामुळे हृदयाच्या आजारांचाही धोका टळतो.

उन्हात बसल्यामुळे काय फायदे मिळतात? (What is the Best Time to Get Vitamin D)

जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या सतावत असेल तर उन्हात बसा यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल. सुर्याच्या प्रकाशामुळे शरीराला नवी उर्जा मिळेल ज्यामुळे ब्लड फ्लो चांगला राहील. इतकंच नाही तर  शरीरात ग्लकोज लेव्हलही सुधारेल.

व्हिटामीन डी मिळवण्यासाठी काय खावे?

१) मशरूम व्हेजिटेयन लोकांसाठी व्हिटामीन डी मिळवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पण मशरूम जर सुर्यप्रकाशात वाढले असेल तरच त्यातून व्हिटामीन डी मिळते. म्हणून मशरूमच्या  पॅकेजवरून  पोषणमूल्य वाचून घ्या.

पोट झटपट कमी करायचंय? ५ हलके फुलके पदार्थ कितीही खा, १ किलोही वजन वाढणार नाही

२) ग्लासभर  दूध पिऊन तुम्ही हाडांना आतल्या बाजूने मजबूत बनवू शकता. हे एक नॅच्युरल ड्रिंक आहे. जे व्हिटामीन डी बरोबर कॅल्शियमसुद्धा तेते. युएसडीएच्या रिपोर्टनुसार १०० एमएल दूधात जवळपास व्हिटामीन डी आणि ११३ एमजी कॅल्शियम असते. 

प्रोटीन्स, व्हिटामीन्सनी खच्चून भरलेत १० वेगन पदार्थ; रस्त्यावर मिळेल २० रूपयांना वाटा-रोज खा

३) संत्र्यात व्हिटामीन सी भरपूर असते. बाजारात फोर्टीफाईट ऑरेंज ज्यूस मोठ्या प्रमाणात मिळतात.  यात व्हिटामीन डी सुद्धा असते. हा ज्यूस प्यायल्यास हाडं मजबूत होण्यास मदत होते.

Web Title: The Right Way to Get Vitamin D From the Sun : What is the Best Time to Get Vitamin D

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.