दातांचा पिवळेपणा, दुर्गंधी, हिरड्यांमध्ये वेदना ही समस्या आजकाल खूपच कॉमन बनली आहे (Teeth Care Tips). या समस्या टाळण्यासाठी लोक मार्केटमध्ये मिळणारे महागडे माऊथवॉश आणि टुथपेस्टचा वापर करत आहेत. जे नेहमीच परीणामकारक ठरतील असं नाही. ओरल हेल्थशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तुरटी कोणकोणत्या पद्धतीनं वापरता येईल समजून घेऊ (Teeth whitening Remedies At Home) प्रसिद्ध आयुर्वेदीक तज्ज्ञ डॉ. सलिम जैदी यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये ते सांगतात की जर्नल ऑफ क्लिनिकल एंड डायग्नोस्टिक रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार तुरटीच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तुरटीत नैसर्गिक एंटी बॅक्टेरिअलआणि एंटी सेप्टीक गुण असतात जे तोंडाच्या आतील बॅक्टेरियांना नष्ट करतात.(Ref) याच्या नियमित वापरानं दातांचा पिवळेपणा कमी होतो, प्लाक कमी होते जिंजिवायटिसपासून आराम मिळतो. तोंडाला फोड येणं, लालसरपणा कमी होतो. याशिवाय श्वासांना दुर्गंधही येत नाही.(How To Use Fitkari Alum For Teeth whitening)
तुरटीचा वापर दातांवर कसा करावा? (How To Use Alum For Teeth Whitening)
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा ग्लास कोमट पाण्यात २ चिमूट तुरटीची पावडर मिसळा. व्यवस्थित मिसळून या पाण्यानं १ ते २ वेळा गुळण्या करा. हे पाणी तुम्हाला प्यायचे नाही फक्त गुळण्या करण्यासाठी वापरा. नियमित याच्या वापरानं तुम्हाला काही दिवसांतच फरक दिसून येईल.
दिवसातून २ वेळा दोन ते तीन मिनिटं गुळण्या करून पाणी थुंकून टाका. डॉक्टर सांगतात की तुरटीचा वापर फक्त गुळण्या करण्यासाठीच करा. तुरटी थेट दातांना लावून घासू नका. यामुळे दातांच्या इनॅमलचं नुकसान होऊ शकतं. हिरड्यांमधून जास्त रक्त येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
तुरटीनं दातांना काय फायदे होतात? (Benefits Of Alum For Teeth)
तुरटीतील एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म तोंडातील हानीकारक जिवाणूंचा नाश करतात ज्यामुळे दुर्गंध येत नाही. तुरटी हिरड्यांवरील सूज, रक्तस्त्राव कमी करण्यास मदत करते. हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येवर हे फायदेशीर ठरते. तोंडातील अल्सर किंवा वेदना कमी करण्यास तुरटी मदत करते. तुरटीच्या पाण्यानं गुळण्या केल्यास दातांवर किटाणू आणि प्लाक कमी होतात.