Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मुलांचे दात वाकडे-तिकडे येतात? दात कोणत्या वयात पडल्याने सरळ येतात? नव्या दातांची कशी काळजी घ्याल?

मुलांचे दात वाकडे-तिकडे येतात? दात कोणत्या वयात पडल्याने सरळ येतात? नव्या दातांची कशी काळजी घ्याल?

Teeth development in children : लहान मुलांचे दात कोणत्या वयात पडतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2024 02:59 PM2024-03-31T14:59:21+5:302024-03-31T15:01:26+5:30

Teeth development in children : लहान मुलांचे दात कोणत्या वयात पडतात?

Teeth development in children | मुलांचे दात वाकडे-तिकडे येतात? दात कोणत्या वयात पडल्याने सरळ येतात? नव्या दातांची कशी काळजी घ्याल?

मुलांचे दात वाकडे-तिकडे येतात? दात कोणत्या वयात पडल्याने सरळ येतात? नव्या दातांची कशी काळजी घ्याल?

आजकाल मुलं जंक फूडच्या अधिक आहारी गेले आहेत (Tooth Care). फास्ट फूड मुलांना पोकळ बनवत आहेत. सध्या अनेक मुलांचे दुधाचे दात वेळेवर पडत नाहीत, काही मुलांचे दुधाचे दात वेळेपूर्वी पडतात तर काहींचे दात उशिरा पडतात. दुधाचे दात वेळेवर न पडणे ही एक मोठी समस्या आहे, यामुळे मुलांचे नवीन दात समान आणि योग्यरित्या येत नाही (Parenting Tips).

अशा परिस्थितीत कधी-कधी चेहऱ्याचा लूक खराब होतो आणि दात स्वच्छ करण्यातही अडचण येते. आजकाल ही समस्या बहुतेक मुलांमध्ये आढळते. त्यामुळे नेमकं कोणत्या वयात दात पडायला हवेत? नवीन आलेल्या दातांची कधी काळजी घ्यायची?(Teeth development in children).

कोणत्या वयात मुलांचे दुधाचे दात पडू नयेत?

मेयो क्लिनिक या वेबसाईटनुसार, मुलांचे दुधाचे दात साधारणत: वयाच्या ७ व्या वर्षी हलायला लागतात, आणि वयाच्या १३ व्या वर्षीपर्यंत सगळे दात पडतात. त्यामुळे मुलांचे दात हे साधारण ७ ते १३ व्या वर्षात पडायला हवेत.

ज्या मुलांचे दात वेळेपूर्वी पडतात, त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण अशावेळी स्पेस मेंटेनर घातल्याने रिकामी जागा भरली जाते आणि दात वाकड्या पद्धतीने येत नाही.

जिने चढताना-चालताना दम लागतो? जीवनशैलीत करा ४ सोपे बदल; पन्नाशीनंतरही राहाल फिट

आजकाल फारच कमी लोकांना अक्कल दाढ येते. बहुतांश लोकांची अक्कल दाढ अर्धवट येते. ज्यामुळे इन्फेक्शन तर होतेच, शिवाय हिरड्या आणि गालांमध्ये वेदना आणि सूज येण्याची समस्याही निर्माण होते. अक्कल दाढ नेहमी १८ ते २२ वयापर्यंत येते.

पालकांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी?

मुलांना खाल्ल्यानंतर गार्गल करण्याची सवय लावा.

अर्धा लिटर दूध-३ ब्रेड स्लाइज, थंडगार व्हॅनिला आईस्क्रीमची सोपी कृती; १५ मिनिटात आईस्क्रीम तयार..

किमान रोज सकाळी दात घासण्याची सवय लावा.

मिठाई आणि चॉकलेट शक्यतो कमी खा.

मुलांना अंगठा चोखणे किंवा बोटे चघळणे यासारख्या सवयींपासून रोखा. 

Web Title: Teeth development in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.