भारतीयांसाठी 'चहा' हे फक्त पेय नाही, तर एक भावना आहे! दिवसाची सुरुवात असो, कामातून मिळालेला छोटा ब्रेक असो किंवा संध्याकाळचा आळस दूर करायचा असो, कपभर गरमागरम चहा पुन्हा नव्याने एनर्जी देतो. परंतु, अनेक चहाप्रेमींना एक प्रश्न नेहमी सतावतो, आणि तो म्हणजे, गरमागरम चहा पिऊन झाल्यावर लगेच पाणी प्यायचे की नाही? काहीजण म्हणतात,चहावर पाणी प्यायल्याने दातांना कीड लागून नुकसान होते, तर काहींच्या मते शरीरात आम्लपित्त वाढते. खरंतर, चहा प्यायल्यावर पाणी पिण्याचा योग्य वेळ आणि पद्धत जाणून घेतली, तर त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम खूपच वेगळे असतात(tea drinking water right time).
चहामध्ये असलेले टॅनिन, कॅफिन आणि अँटिऑक्सिडंट्स हे घटक शरीरावर वेगवेगळा परिणाम करतात. त्यामुळे चहा प्यायल्यावर लगेच पाणी प्यायल्यास काही तोटे होऊ शकतात, तर काहीवेळ थांबून पाणी प्यायल्यास त्याचे फायदे देखील मिळू शकतात. चहा प्यायल्यावर पाणी नेमकं कधी प्यावं, त्याचे आरोग्याला फायदे आणि तोटे काय आहेत ते पाहूयात... रीवा आयुर्वेद हॉस्पिटलचे डीन डॉ. दीपक कुलश्रेष्ठ यांनी याबाबत एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अधिक माहिती दिली आहे. चहा (should you drink water after tea) प्यायल्यावर नेमके पाणी प्यावे का, कधी आणि किती प्यावे याबद्दल तज्ज्ञांचे मत नेमकं काय आहे ते पाहूयात.
चहा पिण्यापूर्वी पाणी पिण्याचे फायदे...
जर चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायले तर नेमकं होत काय ते पाहूयात, जर आपण सकाळी उठून थेट चहा पीत असू, तर यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते; यामुळे गॅस आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्यांचे प्रमाण वाढू शकते. अशावेळी चहा पिण्यापूर्वी पाणी नक्कीच पिऊ शकता. यासाठी कोमट पाणी हा एक खूप चांगला पर्याय आहे. असे केल्याने तुमच्या शरीराचा पीएच (pH) संतुलित राहतो. म्हणजेच, चहा पिण्यापूर्वी पाणी पिणे फायदेशीर ठरते.
पोट साफ न होण्याची चिंता सोडा! 'हे' जादुई पान रात्री चावून खा - आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय...
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याने काय परिणाम होतात?
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही? असा प्रश्न पडतो, यावर उत्तर म्हणून डॉ. दीपक कुलश्रेष्ठ सांगतात, चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे सर्दी-खोकला आणि दात किडणे यांसारख्या समस्या त्रास देऊ शकतात. जे लोक गरम चहा प्यायल्यानंतर लगेच त्यावर थंड पाणी पितात, त्यांना दातांच्या समस्या सर्वात जास्त सतावतात. काहीजणांना चहा प्यायल्यावर लगेच पाणी पिण्याची सवय असते, त्यांच्या दातांमध्ये सेन्सिटिव्हिटी देखील वाढते आणि थंड - गरम काहीही खाल्ल्यावर दातांमधून तीव्र कळा येऊ लागतात.
फॅटी लिव्हरचा त्रास? रोजच्या आहारात करा ' एवढाच ' बदल - गंभीर दुखणे होईल कमी...
चहा प्यायल्यावर किती वेळ पाणी पिऊ नये?
चहा प्यायल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये, जर खूपच गरजेचे असेल, तर तुम्ही एक घोट हलके कोमट किंवा नॉर्मल पाणी पिऊ शकता. जास्त चहा पिण्यानेही तुम्हाला त्रास होऊ शकतो, म्हणूनच दिवसात दोनपेक्षा जास्त वेळा चहा पिणे टाळाच. चहा घेताना नेहमी सोबत काहीतरी खा, रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.