Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > किडनीमध्ये काही गडबड असेल रात्री शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, उशीर होण्याआधी घ्या योग्य उपचार

किडनीमध्ये काही गडबड असेल रात्री शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, उशीर होण्याआधी घ्या योग्य उपचार

Kidney Damage Sign At Night : किडनी डॅमेज होत असेल तर शरीरात रात्री काही लक्षणं दिसतात. जी तुम्हाला माहीत असावी, जेणेकरून योग्य वेळी योग्य ते उपाय करू शकाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:13 IST2025-06-10T15:12:59+5:302025-06-10T15:13:32+5:30

Kidney Damage Sign At Night : किडनी डॅमेज होत असेल तर शरीरात रात्री काही लक्षणं दिसतात. जी तुम्हाला माहीत असावी, जेणेकरून योग्य वेळी योग्य ते उपाय करू शकाल.

Symptoms seen at night sign of kidney damage | किडनीमध्ये काही गडबड असेल रात्री शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, उशीर होण्याआधी घ्या योग्य उपचार

किडनीमध्ये काही गडबड असेल रात्री शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, उशीर होण्याआधी घ्या योग्य उपचार

Kidney Damage Sign At Night : आजकाल किडनीच्या डॉक्टरांची चांगलीच कमाई होत आहे. कारण जास्तीत जास्त लोक किडनीसंबंधी वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. कुणी किडनी स्टोन तर कुणी किडनी डॅमेजचे रूग्ण आहेत. चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीराची हालचाल न करणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे किडनीसंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहे. जर किडनीसंबंधी काही समस्या असेल आणि वेळीच उपचार केले गेले नाही तर किडनी डॅमेजही होऊ शकते. अशात किडनी डॅमेज होत असेल तर शरीरात रात्री काही लक्षणं दिसतात. जी तुम्हाला माहीत असावी, जेणेकरून योग्य वेळी योग्य ते उपाय करू शकाल.

पुन्हा पुन्हा लघवी येणे

रात्री जर तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवी येत असेल तर हा किडनीमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संकेत असू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना भेटा. ते सांगितल त्या टेस्ट करा आणि योग्य ते उपचार घ्या. सामान्य समस्या समजून कानाडोळा कराल तर महागात पडू शकतं.

पायांवर सूज येणे

रात्री झोपतेवेळी पायांवर सूज येत असेल तर या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण शरीरात पाणी आणि सोडिअम जास्त प्रमाणात स्टोर झाल्यानं पायांवर सूज येऊ शकते. हे लक्षण तुम्हाला असा संकेत देतं की, तुमची किडनी योग्यपणे काम करत नाहीये.

श्वास भरून येणे

रात्री झोपेवेळी श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हा किडनीसंबंधी समस्येचा संकेत असू शकतो. जर तुम्हाला असं लक्षण नेहमीच जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या.

जास्त तहान लागणे

जर तुम्हाला रात्री जास्त तहान लागत असेल म्हणजे रात्री पाणी पिण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. किडनी डॅमेज झाली असेल किंवा होत असेल तेव्हा शरीरात पाणी कमी होतं आणि त्यामुळे जास्त तहान लागते.

Web Title: Symptoms seen at night sign of kidney damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.