Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पाय सतत दुखतात, सूज येत असेल तर करू नका कानाडोळा; 'हे' संकेत दिसले की डॉक्टरांकडे पळा...

पाय सतत दुखतात, सूज येत असेल तर करू नका कानाडोळा; 'हे' संकेत दिसले की डॉक्टरांकडे पळा...

Nerve Disease Symptoms : नसांसंबंधी समस्या फार कॉमन झाल्या आहेत आणि जर वेळीच यावर उपाय केले नाही तर गंभीर रूप घेऊ शकतात. अशात नसांसंबंधी ५ अशा संकेतांबाबत पाहुया ज्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 11:41 IST2025-07-03T11:39:53+5:302025-07-03T11:41:01+5:30

Nerve Disease Symptoms : नसांसंबंधी समस्या फार कॉमन झाल्या आहेत आणि जर वेळीच यावर उपाय केले नाही तर गंभीर रूप घेऊ शकतात. अशात नसांसंबंधी ५ अशा संकेतांबाबत पाहुया ज्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

Symptoms of serious nerve related disease you should not avoid | पाय सतत दुखतात, सूज येत असेल तर करू नका कानाडोळा; 'हे' संकेत दिसले की डॉक्टरांकडे पळा...

पाय सतत दुखतात, सूज येत असेल तर करू नका कानाडोळा; 'हे' संकेत दिसले की डॉक्टरांकडे पळा...

Nerve Disease Symptoms : आजकाल शरीरासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढत आहेत. यातील काही आजार असेही असतात, ज्यांबाबत आपल्याला माहितही नसतं. तर काही आजार असे असतात ज्यांकडे आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो. नसांसंबंधी समस्यांकडेही बरंच दुर्लक्ष केलं जातं. व्हस्कुलर सर्जन आणि व्हेरिकोज व्हेन स्पेशलिस्ट डॉ. सुमित कपाडिया सांगतात की, नसांसंबंधी समस्या फार कॉमन झाल्या आहेत आणि जर वेळीच यावर उपाय केले नाही तर गंभीर रूप घेऊ शकतात. अशात नसांसंबंधी ५ अशा संकेतांबाबत पाहुया ज्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

पायांमध्ये सतत वेदना

जर जास्त वेळ उभं राहिल्यानं किंवा बसल्यावर आपल्या पायांमध्ये सतत वेदना होत असेल, जडपणा वाटत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण हा Venous Insufficiency किंवा व्हेरिकोज व्हेंसचा सुरूवातीचा संकेत असू शकतो. यावरून हे दिसून येतं की, आपल्या नसांमध्ये रक्तप्रवाह सुरळीतपणे होत नाहीये.

पायावर सूज

खासकरून पायांच्या खालच्या भागात नेहमीच सूज येत असेल तर हा खराब ब्लड सर्कुलेशन किंवा नसांमध्ये रक्त जमा झाल्याचा संकेत असू शकतो. या गोष्टीला अनेकदा लोक थकवा समजतात, पण हे शरीराच्या आतील समस्येचं लक्षण असू शकतं.

व्हेरिकोज किंवा स्पायडर व्हेन्स

बऱ्याचदा आपण असा विचार करतो की, व्हेरिकोज व्हेन्स किंवा स्पायडर व्हेन्स ब्यूटीसंबंधी समस्या आहे. पण जर नसांमध्ये वेदना होत असेल, त्यांमध्ये सूज असेल तर हा नसांचा काहीतरी आजार असल्याचं संकेत असू शकतो. यातून हे दिसून येतं की, नसा योग्यपणे काम करत नाहीयेत.

पायांवरील जखम बरी न होणे

जर पायांवरील जखम बऱ्याच दिवसांपासून बरी होत नसेल तर हा Advanced Vein Disease चा संकेत असू शकतो. या स्थितीत वेळीच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आणि योग्य ते उपचार घेतले पाहिजे.

त्वचेच्या रंगात बदल

पायांच्या खालच्या भागात त्वचेचा रंग भुरका, जांबळा किंवा लाल झाला असेल, त्वचा जाड झाली असेल तर हा Chronic Venous Insufficiency किंवा वीनस अल्सर विकसित झाल्याचा संकेत असू शकतो. रक्त पायांमध्ये जमा झाल्यानं त्वचा प्रभावित होत असल्याचं लक्षण आहे. 

Web Title: Symptoms of serious nerve related disease you should not avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.