Join us

सकाळी पोट नीट साफ होतच नाही? फिटनेस ट्रेनर अंशुका सांगते १ उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 22:19 IST

Benefits of Drinking Water in Malasana : How To Get Relief From Constipation : Yoga for Constipation : Malasana to fight constipation Benefits & the right way to do it : Suffering from constipation Try this yogasana for overall good digestion : काही केल्या सकाळी पोट नीट साफ होतंच नाही, करुन पहा मिनिटभरासाठी हा खास उपाय...

आपल्यापैकी काही जणांना पोटाच्या अनेक समस्या कायम वर्षभर सतावतात. काहीवेळा पोटाच्या वारंवार येणाऱ्या सततच्या तक्रारींमुळे नकोसे होते. याचबरोबर सकाळच्या वेळी व्यवस्थित (How To Get Relief From Constipation) पोट साफ न होणे, हवं तसे प्रेशर न येणे, पोटात सतत गुडगुड होत राहणं अशा अनेक समस्या (Yoga for Constipation) छळतात. सकाळच्या वेळी जर व्यवस्थित पोट साफ झाले नाही तर दिवसभर बिघडलेलं पोट (Suffering from constipation Try this yogasana for overall good digestion) अधिकच त्रास देत. अशावेळी पोट साफ करण्यासाठी आपण एक खास योगासनं नक्की करु शकतो. 'मलासन' हा देखील एक योगासनांमधील एक उत्तम असा प्रकार आहे. ज्यांना पोटाच्या समस्या आहेत अशा लोकांनी नियमित मलासनाचा सराव केल्यास पोटाच्या अनेक समस्या कमी होतात. 'मलासन' करणं खूपच सोपं आहे(Benefits of Drinking Water in Malasana).

मलासन केल्याने गॅस आणि अ‍ॅसिडीटीसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात. याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. डोकेदुखी आणि मायग्रेनपासून बचाव होतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, तणाव कमी होतो, वजन कमी होते आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. तसेच, लघवीतील जळजळ काम होते आणि त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. याशिवाय शरीराचे तापमान नियंत्रणात राहते, शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते आणि नवीन पेशी आणि स्नायू तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते. त्यामुळे मलासन करता करता पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक व्याधी बऱ्या होण्यास मदत मिळते. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी पाणी पीत पीत 'मलासन' करण्याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत.

मलासन करण्याची योग्य पद्धत :- 

१. सर्वातआधी योगा मॅटवर सरळ उभे राहा.  २. पाय सरळ ठेवत पोट आतमध्ये घ्या.  ३. खांदे ताणून घ्या आणि दीर्घ श्वास घ्या.  ४. हात जोडून नमस्कार करा.  ५. श्वास सोडत गुडघे दुमडून खाली बसा.  ६. पायांच्या जांघेमध्ये ताण येईल अशा पद्धतीने दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने ताणून घ्यावेत.  ७. या स्थितीत राहून पाणी प्यावे.( योगा करताना थोडे थोडे पाणी प्या. एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. स्वतःला हायड्रेटेड ठेवा, परंतु योग करण्यापूर्वी किंवा दरम्यान जास्त पाणी पिणे टाळा.) ८. दीर्घ श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीत यावे. 

थंडीत न चुकता ‘या’ ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत...

हिवाळ्यात थंडीमुळे हुडहुडी भरते? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते थंडी पळवण्यासाठी खास ३ योगासनं...

मलासनामध्ये बसून पाणी पिण्याचे नेमके कोणते फायदे होतात ? 

१. हायड्रेशन :- चांगले आरोग्य राखण्यासाठी तसेच थकवा आणि स्नायूमध्ये येणारे क्रॅम्प टाळण्यासाठी, योगा करताना हायड्रेटेड राहणे महत्वाचे असते. मलासना योगा करताना पाणी पिऊन हे सर्व फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात.

२. शरीराची लवचिकता वाढवते :- मलासन हे नितंब आणि कंबरेभोवतीच्या अवयवांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. हायड्रेटेड राहिल्याने या भागांमधील  लवचिकता वाढते, ज्यामुळे ही योग मुद्रा करणे सोपे जाते. 

३. पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत होते :- मलासनाची स्क्वॅट पोझिशन आणि पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि आसन करताना होणाऱ्या समस्या टाळता येतात. या स्थितीत बसल्याने आतड्याची हालचाल जलद होते आणि सकाळी पोट सहज साफ होते.

४. डिटॉक्सिफिकेशन :- हायड्रेशन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि मलासनाच्या वेळी पाणी पिऊन हा फायदा मिळू शकतो. 

५. स्नायू चांगले काम करतात :- जेव्हा शरीर चांगले हायड्रेटेड राहते तेव्हा स्नायू चांगले काम करतात. तसेच, मलासन करताना पाणी प्यायलायने स्थिरता आणि संतुलन राखण्यास मदत होते. 

मलासन हा स्क्वाटचा एक प्रकार आहे. ज्यामुळे नितंब सुडौल होतात आणि पोटाच्या समस्या दूर होतात. जर आपण पहिल्यांदाच मलासनाचा सराव करणार असाल तर भिंत किंवा एखाद्या गोष्टीचा पाठीला आधार घ्या. सरावाने आधाराशिवाय तुम्ही मलासन योग्य पद्धतीने करू शकता.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सयोगासने प्रकार व फायदेफिटनेस टिप्स