आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर आपला संपूर्ण दिवस कसा जाईल हे अवलंबून असते. याचबरोबर, सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी पाणी पिण्याची ही सवय आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली मानली जाते. या एका साध्या सवयीमुळे पचन सुधारते, चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. सकाळी उठून सर्वात आधी पाणी पिण्यासोबतच, हे पाणी आपण कोणत्या भांड्यातून पित आहोत, यालाही तितकेच महत्त्व असते(steel clay or copper vessels which water should you drink first thing in morning).
सकाळी उठून आपण जे पाणी पितो ते कोणत्या भांड्यात ठेवलेले असावे याचा देखील शरीरावर महत्त्वाचा परिणाम होतो, हे अनेकांना माहीत नसते. आपल्या घरात स्टील, तांबे किंवा मातीची भांडी सहज उपलब्ध असतात; मात्र कोणत्या भांड्यातील पाणी कोणत्या समस्यांवर उपयुक्त ठरते, कोणत्या भांड्यातून पाणी प्यायल्याने त्याचे गुणधर्म कसे बदलतात आणि कोणत्या भांड्यातील पाणी शरीरशुद्धी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास अधिक मदत करते, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. हेल्थ एक्सपर्ट राजीव दीक्षित यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी सकाळी उठल्या - उठल्या तांबे, माती आणि स्टीलच्या भांड्यांतून पाणी पिण्याचे वेगवेगळे फायदे आणि कोणत्या भांड्याची योग्य निवड करावी याबद्दल सांगितले आहे.
सकाळी उठल्यावर कोणते पाणी प्यावे ?
हेल्थ एक्सपर्ट राजीव दीक्षित यांच्या मते, सकाळी उठल्यावर हलके कोमट किंवा नॉर्मल पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास, पचन सुधारण्यास आणि चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यास मदत मिळते. हेल्थ एक्स्पर्ट यांनी सांगितले की, सकाळी उठल्याबरोबर थंड पाणी पिणे टाळावे आणि बसून, हळू-हळू पाणी प्यावे. याचबरोबर, एकाच वेळी खूप जास्त पाणी पिऊ नये.
सकाळी स्टीलच्या भांड्यातून पाणी पिण्याने काय होते ?
सकाळी स्टीलच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी योग्य मानले जाते. याचे शरीरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. स्टील हा एक नॉन-रिअॅक्टिव्ह (Non-Reactive) धातू आहे, जो पाण्यात कोणतेही रसायन सोडत नाही आणि पाण्याची चव देखील बदलत नाही.
सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने काय होते ?
सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर असते. सकाळी तांब्याचे पाणी प्यायल्याने पचनात सुधारणा होते. हे जीवाणूंशी लढण्यास आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिणे सर्वात जास्त फायदेशीर मानले जाते. तांब्यामध्ये अँटीमायक्रोबियल, अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला अनेक फायदे पोहोचवतात.
सकाळी मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याने काय होत ?
मातीची भांडी पाणी नैसर्गिकरित्या थंड ठेवतात आणि पाण्याचा पीएच स्तर सुधारतात. परंतु, मातीच्या भांड्यातील पाणी फक्त उन्हाळ्याच्या हंगामात पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
सकाळी उपाशी पोटी तोंड न धुता पाणी पिण्याचे फायदे...
१. पचनात सुधारणा :- सकाळी उपाशी पोटी तोंड न धुता पाणी पिण्यामुळे आतड्यांची आतून स्वच्छता होते आणि शौचास नियमित होण्यास मदत मिळते.
२. विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास उपयुक्त :- सकाळी लवकर पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.
३. चयापचय क्रियेचा वेग वाढतो :- रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढण्यास मदत होते.
४. त्वचा आणि केसांसाठी आरोग्यदायी :- शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते, तसेच केसांनाही मजबुती मिळते.
