अनेक लोक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. मात्र काही जण दिवसाची सुरुवात उपाशीपोटी गरम पाणी पिऊन करणे पसंत करतात. आयुर्वेदातही सकाळी कोमट किंवा गरम पाणी पिण्याची सवय शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. (Start your day with glass of warm water , health care tips , home remedies )हा साधा उपाय शरीराला आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आणि अनेक छोट्या त्रासांपासून आराम मिळवून देऊ शकतो.
सकाळी झोपून उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. रात्री झोपेत असताना शरीर अनेक प्रक्रिया करत असते. त्यामुळे सकाळी कोमट पाणी घेतल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. अनेकांना सकाळी पोट साफ होण्यास त्रास होतो. अशावेळी गरम पाणी पिण्याची सवय उपयोगी ठरू शकते. याशिवाय गरम पाणी शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते. त्यामुळे शरीर हलके वाटते आणि दिवसाची सुरुवात फ्रेश वाटते. काही लोक वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही हा उपाय करतात. कोमट पाणी मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करु शकते. घसा दुखणे, कफ किंवा सर्दीचा त्रास असेल तर गरम पाणी आराम देण्याचे काम करते.
त्वचेसाठीही हा उपाय फायदेशीर मानला जातो. शरीर हायड्रेटेड राहिल्यामुळे त्वचा तजेलदार दिसण्यास मदत मिळू शकते. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता कमी करण्यासाठीही सकाळी गरम पाणी पिणे उपयुक्त ठरते.
मात्र हा उपाय करताना काही चुका टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. खूपच उकळते किंवा जास्त गरम पाणी पिणे टाळावे. त्यामुळे घसा किंवा पोटाला त्रास होऊ शकतो. कोमट तापमानातील पाणी पिणे अधिक योग्य मानले जाते. काही लोक वजन कमी करण्यासाठी सकाळी फक्त गरम पाणी पिऊन बराच वेळ काही खात नाहीत, पण हे योग्य नाही. शरीराला आवश्यक पोषण मिळणेही गरजेचे असते.
तसेच गरम पाण्यात लिंबू किंवा मध घालत असाल तर त्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे. जास्त प्रमाणात लिंबू घेतल्यास अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो. ज्यांना पोटाचे विकार, अल्सर किंवा इतर आरोग्य समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय नियमित करावा. सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिण्याची सवय ही साधी असली तरी शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र योग्य पद्धतीने आणि मर्यादेत हा उपाय केल्यास त्याचा अधिक चांगला फायदा मिळू शकतो.
Web Summary : Starting the day with warm water aids digestion, detoxifies, and improves circulation. Avoid excessively hot water and prolonged fasting. Moderation is key, especially with lemon or honey. Consult a doctor if you have existing health issues.
Web Summary : दिन की शुरुआत गर्म पानी से करने से पाचन क्रिया दुरुस्त होती है, शरीर से विषाक्त पदार्थ निकलते हैं और रक्त संचार बेहतर होता है। अत्यधिक गर्म पानी और लंबे समय तक उपवास करने से बचें। नींबू या शहद के साथ संयम बरतना महत्वपूर्ण है। यदि आपको पहले से कोई स्वास्थ्य समस्या है तो डॉक्टर से सलाह लें।