Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज सकाळी गरम पाणी-लिंबाचा रस पिण्याचे फायदेच माहिती नाहीत? त्वचा-वजन-आवाज सगळंच जाईल बदलून

रोज सकाळी गरम पाणी-लिंबाचा रस पिण्याचे फायदेच माहिती नाहीत? त्वचा-वजन-आवाज सगळंच जाईल बदलून

Start your day with glass of warm lemon water, health tips, weight loss tips : रोज प्या गरम लिंबू पाणी. आरोग्यासाठी एकदम मस्त. पाहा कमालीचे फायदे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2025 15:04 IST2025-08-20T15:03:05+5:302025-08-20T15:04:18+5:30

Start your day with glass of warm lemon water, health tips, weight loss tips : रोज प्या गरम लिंबू पाणी. आरोग्यासाठी एकदम मस्त. पाहा कमालीचे फायदे.

Start your day with glass of warm lemon water, health tips, weight loss tips | रोज सकाळी गरम पाणी-लिंबाचा रस पिण्याचे फायदेच माहिती नाहीत? त्वचा-वजन-आवाज सगळंच जाईल बदलून

रोज सकाळी गरम पाणी-लिंबाचा रस पिण्याचे फायदेच माहिती नाहीत? त्वचा-वजन-आवाज सगळंच जाईल बदलून

लिंबू पाणीआरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते. अनेक जण रोज सकाळी ग्लास भरुन लिंबू पाणी पितात. दिवसाची सुरवात लिंबू पाण्याने केल्यामुळे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. (Start your day with glass of warm lemon water, health tips, weight loss tips )मात्र कोमट किंवा गरम पाणी लिंबाच्या रसासोबत पिणे जास्त फायद्याचे ठरते. कारण साध्या पाण्यापेक्षा गरम पाण्यातून लिंबाचा रस पिणे शरीरासाठी जास्त परिणामकारक ठरते. गरम पाणी शरीराच्या आत सहज शोषले जाते आणि पचनक्रियेला चालना देण्याची त्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे गरम पाणी आरोग्यासाठी जास्त फायद्याचे ठरते. लिंबामध्ये असलेले जीवनसत्त्व 'सी', अँण्टी ऑक्सिडंट्स आणि खनिजे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. जेव्हा हे घटक गरम पाण्यात मिसळले जातात तेव्हा ते शरीरात पटकन शोषले जातात आणि सकाळच्या वेळेस मेटाबॉलिझम चांगले करण्यास मदत करतात.

गरम पाण्यात लिंबू घेतल्याने पचन सुधारते. गॅस, अपचन किंवा पोटातील जडपणा कमी होतो. पोट हलके वाटायला लागते. आतड्यांची हालचाल एकदम सुरळीत राहते. त्याबरोबर गरम पाणी रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी जाणवतो. साध्या पाण्यात लिंबू मिसळून पिण्याचे देखील फायदे मिळतातच. पण गरम पाणी घेतल्याने रक्तवाहिन्या खुल्या होतात. तसेच घसाही साफ होतो. घशाची खवखव कमी होते. लिंबातील गुणधर्म आणि गरम पाण्यातील उष्णता घशासाठी उपयुक्त ठरते. 

लिंबू आणि गरम पाण्याचे मिश्रण वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. अनेक जण हे मिश्रण वेटलॉस ड्रिंक म्हणून पितात. कारण ते चरबी वितळवण्यासाठी मदत करते. फक्त वजन नाही तर त्वचाही छान राहते. त्वचेसाठी हे पाणी एकदम फायद्याचे कारण त्यातील अँण्टी ऑक्सिडंट्स त्वचेतील विषारी पदार्थ कमी करून तजेलदारपणा वाढवतात. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू घेणे म्हणजे शरीराला एक नैसर्गिक डिटॉक्स देणे आणि दिवसाची सुरुवात हलक्याशा पण प्रभावी ऊर्जेसह करणे. ही सवय लावून घ्या. फार उपयुक्त ठरेल. 

Web Title: Start your day with glass of warm lemon water, health tips, weight loss tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.