Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ना दारू ना कधी नॉन व्हेज, सोनू सूद सांगतोय त्याचं फिटनेस सिक्रेट, पाहा तो काय खातो....

ना दारू ना कधी नॉन व्हेज, सोनू सूद सांगतोय त्याचं फिटनेस सिक्रेट, पाहा तो काय खातो....

Sonu Sood Fitness Tips : '....मी कधीच मद्यपान आणि मांसाहार केलेले नाही'; सोनू सूदनं सांगितलं फिटनेस सिक्रेट, पाहा तो काय खातो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:05 IST2025-01-14T13:27:31+5:302025-01-14T18:05:59+5:30

Sonu Sood Fitness Tips : '....मी कधीच मद्यपान आणि मांसाहार केलेले नाही'; सोनू सूदनं सांगितलं फिटनेस सिक्रेट, पाहा तो काय खातो

Sonu Sood Fitness Tips Reveales Secret Diet Eating Butter Every Nighy Health Tips | ना दारू ना कधी नॉन व्हेज, सोनू सूद सांगतोय त्याचं फिटनेस सिक्रेट, पाहा तो काय खातो....

ना दारू ना कधी नॉन व्हेज, सोनू सूद सांगतोय त्याचं फिटनेस सिक्रेट, पाहा तो काय खातो....

आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये बरेच लोक व्हेजिटेरीयन राहणं पसंत करतात. कारण व्हेजिटेरीयन अन्न खाल्ल्यानं गंभीर आजारांचा धोका कमी होतो (Sonu Sood Diet).  शरीर दीर्घकाळ हेल्दी राहतं. अभिनेता सोनू सूदनं आपल्या फिटनेसबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. काही व्हेजिटेरियन पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही स्वत:ला फिट, मेंटेन ठेवू शकता. (Sonu Sood Fitness Tips Reveales Secret Diet Eating Butter Every Nighy Health Tips)

सोनू सूद सांगतो की त्याने दारू आणि मांसाचे सेवन कधीच केले नाही. जेव्हा त्यानं पहिल्यांदा वर्कआऊट सुरू केला तेव्हा खास डाएटबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यानं व्हेजिटेरियन असल्यामुळे सप्लिमेंट्स आणि स्टेरॉईड्सच्या मदतीनं आपलं शरीर बनवलं.  सोनू सूदनं सांगितलं की ते अमूल बटरचा पूर्ण गोळा खात होते. व्हेज खाण्यात ते काही मिळतं ते खूपच आवडीनं खाल्ले.

५० वर्षांची करिश्मा कपूर रोजच्या जेवणात काय खाते पाहा; पन्नाशीतही दिसते सुंदर

युट्यूबवर शुभंकर मिश्रा  यांच्याशी  बोलताना सोनू यांना त्यांच्या फिटनेस बाबत  विचारल्यास त्यांनी सांगितले की चांगले शरीर मिळवण्यासाठी सप्लिमेंट्स, स्टेरॉईटचा वापर करावा  लागतो.  मी शाकाहारी असून दारू अजिबात पित नाही, मी कधीच नॉनव्हेज खाल्ले नाही. याशिवाय माझ्या  आई वडीलांचे पंजाबी डिएनए मला मिळाले आहेत. माझे वडील खूपच मजबूत होते. मी कुटुंबातील एकटा व्यक्ती आहे ज्यानं अल्कोहोल आणि नॉनव्हेजला कधीच हात लावला नाही आणि  मी फार पार्टीपण करत नाही.

सप्लिमेंट्सबाबत  त्यांनी सांगितले की जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हा मला माहिती नव्हतं की प्रोटीन्स आणि कार्ब्स काय असतात. रोज मी चपाती आणि अमूल बटरची एक पूरी टिक्की खात होतो आणि कच्च दूध प्यायचो. याशिवाय अंड्यांचा पांढरा भाग खायचो. आजसुद्धा अनेक हॉटेलमध्ये शेफ माझ्यासाठी खास अन्न तयार करण्यासाठी विचारतात. मी सॅलेड आणि अंड्याचा पांढरा भाग खाणं पसंत करतो. त्यांनी हे सुद्धा सांगितले की रोज वरण भात खायला आवडते.

सोनू सूदचा आहार काय असतो?

आठवड्यातून ३६५ दिवस मी वर्कआऊट करतो. अलिकडेच मी चपाती खाणं बंद केलं आहे. दुपारी एक वाटी डाळ आणि भात खातो. नाश्त्याला अंड्याचा पांढरा भाग, सॅलेड, एवाकॅडो, तळलेल्या भाज्या, पपई खातो. मी चीट डाएट घेत नाही. 

Web Title: Sonu Sood Fitness Tips Reveales Secret Diet Eating Butter Every Nighy Health Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.