लहान मुलांवर सोशल मीडियाच्या होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये प्रायव्हसीच्या चिंतेपासून ते बुलिंगपर्यंतचा समावेश आहे. आता, एका नव्या रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, सोशल मीडियाचा दीर्घकाळ वापर मुलांचं मानसिक आरोग्य बिघडवतो आणि त्यांना लक्ष केंद्रित करू देत नाही. या रिसर्चमध्ये अमेरिकेतील विविध वयोगटातील हजारो मुलांचा समावेश होता.
स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटने ऑरेगन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने हा रिसर्च केला. रिसर्चदरम्यान, संशोधकांनी मुलांच्या विविध डिजिटल एक्टिव्हिटीच्या कालावधीचे निरीक्षण केलं. रिसर्चमध्ये सहभागी मुलांनी सरासरी २.३ तास टीव्ही किंवा ऑनलाईन व्हिडीओ पाहिले, १.४ तास सोशल मीडिया वापरला आणि १.५ तास व्हिडीओ गेम खेळले.
या सर्व एक्टिव्हिटीपैकी फक्त सोशल मीडियाच्या वापरामुळे अटेन्शनच्या समस्या निर्माण होतात. संशोधकांचं म्हणणं आहे की सोशल मीडियामुळे मुलांचं अटेन्शन कमी होत आहे. एखाद्या मुलावर त्याचा परिणाम कमीत कमी असू शकतो, परंतु जर मोठ्या लोकसंख्येतील मुलं सोशल मीडियाचा अतिरेकी वापर करू लागली तर त्याचा परिणाम लक्षणीय असू शकतो.
रिसर्चचे वरिष्ठ लेखक प्रोफेसर टॉर्केल क्लिंगबर्ग म्हणाले की, सोशल मीडिया इतर डिजिटल माध्यमांपेक्षा अधिक आव्हानात्मक आहे. सतत नोटिफिकेशन, मेसेज आणि अपडेट्स मुलाच्या मेंदूच्या विकासावर आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. मेसेजची वाट पाहणं मेंटल डिस्ट्रेक्शन म्हणून देखील काम करू शकतं, ज्यामुळे ते खेळ किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
