Soaked cloves benefits : स्वयंपाकघरात मसाल्याच्या रूपात वापरली जाणारी लवंग केवळ चवीसाठीच नाही, तर औषधी गुणधर्मांसाठीही प्रसिद्ध आहे. लवंगमध्ये आढळणाऱ्या यूजेनॉल, अॅंटी-ऑक्सिडंट्स आणि अॅंटी-बॅक्टेरियल तत्वांमुळे लवंग आरोग्यासाठी वरदान ठरते.
जर आपण रात्री लवंग पाण्यात भिजवून सकाळी उपाळीपोटी खाल्ली, तर तिचे औषधी गुण अधिक प्रभावी होतात आणि शरीरावर लवकर परिणाम करतात. नियमितपणे भिजवलेली लवंग खाल तर शरीराच्या अनेक लवकर बऱ्या होतात.
भिजवलेल्या लवंगाचे फायदे
पचन तंत्र सुधारतं
भिजवलेली लवंग पचनासाठी खूप फायदेशीर आहे. ती गॅस, अपचन, पोट फुगणे आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्या कमी करते. लवंगमधील कार्मिनेटिव गुणधर्म पचनक्रिया सुरळीत ठेवतात.
सर्दी-खोकला आणि घशातील खरखर दूर करते
लवंग उष्ण असते आणि तिच्यातील अॅंटी-बॅक्टेरियल गुण श्वसननलिका स्वच्छ करतात. भिजवलेली लवंग चघळल्याने किंवा तिचे पाणी प्यायल्याने घशातील खरखर, खोकला आणि सर्दीवर लवकर आराम मिळतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
लवंगमधील अॅंटी-ऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करतात. दररोज सकाळी सेवन केल्यास व्हायरल संसर्गांपासून बचाव होतो.
डायबिटीज नियंत्रणात ठेवते
संशोधनानुसार, लवंग रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी ती फायदेशीर ठरू शकते. मात्र, सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारतं
भिजवलेली लवंग चघळल्याने दातदुखी, हिरड्यांची सूज आणि दुर्गंधीपासून आराम मिळतो. तिचा अॅंटी-सेप्टिक गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतो.
सांधेदुखी आणि सूज कमी करते
लवंगमधील अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण सांधेदुखी आणि सूज कमी करतात. संधिवात असलेल्या व्यक्तींना याचा विशेष लाभ होऊ शकतो.
त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त
लवंगाचे पाणी त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर काढते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते आणि मुरुम कमी होतात. तसेच हे केसगळती नियंत्रित करण्यातही मदत करते.



