Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Deep Sleep Tips: शांत झोप हवीय? 'या' आसनात झोपून पहा; डोळा उघडेल थेट सकाळीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:21 IST

Sleep Tips: शांत झोप मिळाली तर अर्ध्याहून अधिक आजार दूर होतात; तशी झोप मिळावी म्हणून दिलेल्या स्थितीत झोपा, लाभ होईल!

दिवसभर काम करून शरीर थकते, पण रात्री अंथरुणावर पडल्यावर डोक्यात विचारांचे चक्र सुरू राहते आणि झोप उडते. जर तुम्हालाही तासनतास कुस बदलत पडावे लागत असेल, तर योगशास्त्रातील 'मत्स्य क्रीडासन' तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. हे एक असे आसन आहे जे झोपतानाच करायचे असते.

मत्स्य क्रीडासन म्हणजे काय?

या आसनात शरीराची स्थिती पाण्यातील मासा ज्याप्रमाणे पोहताना किंवा उसळी मारताना दिसतो, तशी असते. हे आसन विश्रांतीसाठी (Relaxation) सर्वोत्तम मानले जाते.

मत्स्य क्रीडासनात झोपण्याचे फायदे:

१. मानसिक तणाव दूर होतो: हे आसन केल्यामुळे मज्जासंस्थेला (Nervous System) आराम मिळतो. मनातील अस्वस्थता कमी होऊन मेंदू शांत होतो, ज्यामुळे नैसर्गिकरित्या झोप येते.  २. घोरण्याची समस्या कमी होते: ज्यांना घोरण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी कुशीवर वळून या स्थितीत झोपणे फायदेशीर ठरते. यामुळे श्वासोच्छवास मोकळा होतो.  ३. पचन सुधारते: या आसनामुळे पोटाच्या स्नायूंवर हलका ताण येतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पचन नीट असेल तर झोप अधिक चांगली लागते.  ४. कंबरदुखीवर आराम: दिवसभर खुर्चीत बसून काम करणाऱ्यांच्या कंबरेवर ताण येतो. मत्स्य क्रीडासनामुळे पाठीचा कणा शिथिल होतो आणि कंबरदुखी कमी होते.  ५. गरोदर महिलांसाठी उपयुक्त: गरोदरपणात सरळ झोपणे कठीण असते, अशा वेळी हे आसन आरामदायक ठरते.

हे आसन कसे करावे?

अंथरुणावर पोटावर (पालथे) झोपा.

आता डाव्या कुशीवर वळा आणि डावा पाय सरळ ठेवा.

उजवा पाय गुडघ्यात दुमडून वरच्या दिशेला (डाव्या मांडीजवळ) घ्या.

दोन्ही हातांची उशी करून त्यावर डोके ठेवा किंवा उजवा हात दुमडून डोक्याखाली घ्या.

डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या आणि पूर्ण शरीर सैल सोडा.

५-१० मिनिटे याच स्थितीत राहिल्यास तुम्हाला शांत झोप लागण्यास सुरुवात होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Sleep Soundly: Try This Yoga Pose for a Peaceful Night

Web Summary : Trouble sleeping? Matsya Kridasana, a yoga posture mimicking a fish, can help. It reduces stress, improves breathing and digestion, relieves back pain, and is beneficial during pregnancy. Lie on your side, bend one leg, and relax for a restful sleep.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सयोगासने प्रकार व फायदे