Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यात पायांची त्वचा आणि नखांना फंगल इन्फेक्शन होतेच, लावा हे आयुर्वेदिक तेल - धोका टाळा...

पावसाळ्यात पायांची त्वचा आणि नखांना फंगल इन्फेक्शन होतेच, लावा हे आयुर्वेदिक तेल - धोका टाळा...

Skin & Nail Fungal Infection Homemade Oil Use During Rainy Season : Rainy season skin & nail fungal infection remedy : Homemade oil for leg fungal infection : Foot and nail fungus home remedy : Foot and nail fungus home remedy: पावसाळ्यात सतत भिजणारे पाय, बंद बूट, दमट वातावरणामुळे पायाची नखं, त्वचेवर बुरशी वाढू नये म्हणून उपाय....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2025 18:25 IST2025-08-04T18:19:20+5:302025-08-04T18:25:30+5:30

Skin & Nail Fungal Infection Homemade Oil Use During Rainy Season : Rainy season skin & nail fungal infection remedy : Homemade oil for leg fungal infection : Foot and nail fungus home remedy : Foot and nail fungus home remedy: पावसाळ्यात सतत भिजणारे पाय, बंद बूट, दमट वातावरणामुळे पायाची नखं, त्वचेवर बुरशी वाढू नये म्हणून उपाय....

Skin & Nail Fungal Infection Homemade Oil Use During Rainy Season Rainy season skin & nail fungal infection remedy Homemade oil for leg fungal infection Foot and nail fungus home remedy How to treat fungal infection in monsoon | पावसाळ्यात पायांची त्वचा आणि नखांना फंगल इन्फेक्शन होतेच, लावा हे आयुर्वेदिक तेल - धोका टाळा...

पावसाळ्यात पायांची त्वचा आणि नखांना फंगल इन्फेक्शन होतेच, लावा हे आयुर्वेदिक तेल - धोका टाळा...

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळा ऋतू येताना आपल्यासोबत आनंद आणि तितक्याच समस्या देखील घेऊन येतो. पावसाळ्यात आपल्याला आरोग्यासोबतच विशेषतः पायांची (Skin & Nail Fungal Infection Homemade Oil Use During Rainy Season) देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात वातावरण ओलसर, दमट असते, हवेत भरपूर आर्द्रता असल्याने त्याचा आपल्या आरोग्यासोबतच पायांच्या नखांवर आणि त्वचेवर (Rainy season skin & nail fungal infection remedy) परिणाम होताना दिसतो. पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी, चिखल, घाण साचते आणि याचा जास्त (Homemade oil for leg fungal infection) संपर्क आपल्या पायांशीच येतो. पावसाळ्यात बरेचदा आपले पाय ( Foot and nail fungus home remedy) पाण्यात भिजून दिवसभर ओलेच राहतात किंवा घाण पाण्याच्या संपर्कात येऊन पायांची त्वचा आणि नखं खराब होतात( Foot and nail fungus home remedy).

पावसाळ्यात पायांची नखं आणि त्वचेवर बुरशी, खाज येणे किंवा त्वचा फाटणे, रखरखीत होणे यांसारख्या समस्या त्रास देतात. यासाठी, पायांची नखं आणि त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. पावसाळ्यात पायाची त्वचा आणि नखांची योग्य काळजी घेण्यासाठी घरगुती जादूई खास तेल कसं तयार करायचं ते पाहूयात. हे तेल तयार करायला खूप सोपं आहे. यामध्ये वापरले जाणारे घटक नैसर्गिक असून, ते अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. या तेलाचा नियमित वापर केल्यास पायांच्या नखांची बुरशी आणि त्वचेच्या इतर समस्या दूर होण्यास मदत होते. पावसाळ्यात सतत भिजणारे पाय, बंद बूट आणि दमट वातावरण यामुळे पायाची नखं आणि त्वचेवर बुरशी वाढू नये म्हणून हा खास उपाय....

पावसाळ्यात पायाची नखं आणि त्वचेवर बुरशी वाढू नये म्हणून... 

पावसाळ्यात पायाची नखं आणि त्वचेवर बुरशी वाढू नये म्हणून खास घरगुती उपाय meenuguptakitchen7 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा खास घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला २ ते ३ टेबलस्पून मोहरीचे तेल, ४ ते ५ लसूण पाकळ्या व १ टेबलस्पून हळद, १ टेबलस्पून मेथी दाणे, चिमूटभर हिंग इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.

नेमका उपाय काय आहे ? 

पावसाळ्यात पायाची नखं आणि त्वचेवर बुरशी वाढू नये म्हणून खास घरगुती आयुर्वेदिक तेल तयार करण्यासाठी एका भांड्यात मोहरीचे तेल घेऊन ते मंद आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर, त्यात मेथी दाणे, लसूण पाकळ्या, हळद व हिंग घालून ५ मिनिटे गरम करावे. त्यानंतर गॅस बंद करून तेल थोडे थंड होऊ द्यावे. तेल थंड झाल्यावर ते एका हवाबंद बाटलीत भरून स्टोअर करावे. 

गरोदरपणानंतर खूप केस गळतात? मेथी दाण्यांचा 'असा' उपाय- विरळ झालेले केस होतील दाट...

आता तयार तेल एका वाटीत घेऊन ते कॉटन बड्सच्या मदतीने पायांची नखं आणि नखांच्या आजूबाजूच्या त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्यावे. या तेलाने आपण पायाच्या त्वचेचा देखील मसाज करु शकतो. या घरगुती पारंपरिक औषधी तेलाने पावसाळ्यात पायाची त्वचा आणि नखांवर बुरशी वाढत नाही. याचबरोबर, त्वचेला खाज येणे किंवा त्वचा फाटणे, रखरखीत होणे यांसारख्या समस्या कमी होतात. 

रात्रीच्या गाढ झोपेतच हार्ट ॲटॅक येण्याची ३ कारणं! दिसतातं 'ही' लक्षणं - दुर्लक्ष करणे पडेल महागात...


 हा उपाय कसा फायदेशीर :-

१. हळद :- हळदीमधील अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे बुरशी नष्ट करण्यास मदत करते.

२. मोहरीचे तेल :- मोहरीचे तेल त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवते आणि संसर्गापासून संरक्षण करते.

३. हिंग :- हिंग त्वचेची खाज आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. 

४. लसूण पाकळ्या :- लसूण पाकळ्यांमध्ये बुरशीस विरोध करणारे नैसर्गिक अँटीफंगल घटक असतात.

५. मेथी दाणे :- त्वचेला पोषण देऊन सुकलेल्या व भेगाळलेल्या त्वचेला बरे करतात.

Web Title: Skin & Nail Fungal Infection Homemade Oil Use During Rainy Season Rainy season skin & nail fungal infection remedy Homemade oil for leg fungal infection Foot and nail fungus home remedy How to treat fungal infection in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.