Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चुका टाळा! रोजच्या 'या' ५ सवयींमुळे होऊ शकतं स्किन इन्फेक्शन; उन्हाळ्यात दहापट वाढतो धोका

चुका टाळा! रोजच्या 'या' ५ सवयींमुळे होऊ शकतं स्किन इन्फेक्शन; उन्हाळ्यात दहापट वाढतो धोका

आपल्या काही दैनंदिन सवयींमुळे स्किन इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात ५ सवयी आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:45 IST2025-03-31T15:42:24+5:302025-03-31T15:45:18+5:30

आपल्या काही दैनंदिन सवयींमुळे स्किन इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात ५ सवयी आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. 

skin care tips these 5 things causes skin infection rapidly in summers | चुका टाळा! रोजच्या 'या' ५ सवयींमुळे होऊ शकतं स्किन इन्फेक्शन; उन्हाळ्यात दहापट वाढतो धोका

चुका टाळा! रोजच्या 'या' ५ सवयींमुळे होऊ शकतं स्किन इन्फेक्शन; उन्हाळ्यात दहापट वाढतो धोका

उन्हाळ्यात तापमान वाढत असताना स्किन इन्फेक्शनचा धोका देखील वाढतो. सतत घाम येणं आणि त्वचेतील ओलावा यामुळे आपली त्वचा खूप संवेदनशील बनते. आपल्या काही दैनंदिन सवयींमुळे स्किन इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात ५ सवयी आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. 

ओले कपडे घालणे

उन्हाळ्यात घाम येणं सामान्य आहे, परंतु ओले कपडे घालल्याने त्वचा ओलसर राहते, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होतं. यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो. म्हणून नेहमी कोरडे आणि सुती कपडे घाला. तसेच कधीकधी जास्त घामामुळे आपले कपडे ओले होतात. या परिस्थितीत, तुम्ही तुमचे कपडे बदलून कोरडे कपडे घालावेत.

सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालणे

स्विमिंग पूल, जिम आणि सार्वजनिक शौचालये यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी फंगस आणि बॅक्टेरियाचा धोका जास्त असतो. अनवाणी चालल्याने हे जंतू तुमच्या त्वचेच्या संपर्कात येऊ शकतात आणि स्किन इन्फेक्शनचा होऊ शकतं. म्हणून नेहमी चप्पल किंवा बूट घाला.

घट्ट कपडे घालणे

उन्हाळ्यात घट्ट कपडे घालणाऱ्या लोकांना स्किन इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. घट्ट कपडे घालल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते, ज्यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो. उन्हाळ्यात सैल कपडे घाला. तुम्ही सुती कपड्यांना प्राधान्य द्या.

घाणेरडा टॉवेल आणि अंथरुणाचा वापर

घाणेरडा टॉवेल आणि अंथरुण हे बॅक्टेरिया आणि फंगसचं ठिकाण बनू शकतं. त्यांचा वापर केल्याने स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो. म्हणून नेहमी स्वच्छ टॉवेल आणि अंथरुण वापरा.

घामाकडे दुर्लक्ष करणे

घामामध्ये मीठ आणि इतर पदार्थ असतात ज्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. उन्हाळ्यात घामाकडे दुर्लक्ष केल्याने स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो. म्हणून नियमितपणे आंघोळ करा आणि घाम स्वच्छ करा.

हे उपाय करा

- नियमितपणे आंघोळ करा आणि तुमची त्वचा स्वच्छ ठेवा.

- सैल आणि सुती कपडे घाला.

- सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालू नका.

- घाणेरडे टॉवेल आणि अंथरुण वापरू नका.

- घामाकडे दुर्लक्ष करू नका.

- निरोगी आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.
 

Web Title: skin care tips these 5 things causes skin infection rapidly in summers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.