Join us

दररोज १० मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसा; तुमच्या शरीराला मिळतील ६ आश्चर्यकारक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:31 IST

गरम पाण्यात पाय ठेवून बसणं ही एक सोपी आणि अतिशय प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

हिवाळ्यात आपलं शरीर निरोगी ठेवणं एक आव्हान असू शकतं. अशा परिस्थितीत, गरम पाण्यात पाय ठेवून बसणं ही एक सोपी आणि अतिशय प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही. हे तुम्ही घरी सहज करू शकता. दररोज फक्त १० मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया...

तणाव आणि थकव्यापासून आराम

गरम पाण्यात पाय ठेवून बसल्याने शरीराच्या मज्जासंस्थेला आराम मिळतो, त्यामुळे दिवसभराचा ताण आणि थकवा कमी होतो. यामुळे मनाला शांती मिळते आणि तुम्हाला आरामही वाटतो.

ब्लड सर्क्युलेशन होतं नीट 

गरम पाण्यात पाय ठेवल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन आणखी चांगलं होतं. यामुळे हात आणि पायांचा थकवा दूर होतो आणि शरीरात उष्णता टिकून राहते.

सुजलेल्या पायांपासून आराम

दिवसभर काम केल्याने किंवा जास्त वेळ उभे राहिल्याने पायांना सूज येऊ शकते. गरम पाण्यात पाय ठेवल्याने सूज आणि दुखण्यापासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही पाण्यात थोडेसं मीठही टाकू शकता.

झोपेची गुणवत्ता सुधारते

जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटं गरम पाण्यात पाय टाकून बसा. ही प्रक्रिया शरीराला शांत करते आणि चांगली झोप घेण्यास मदत करते.

स्कीन इन्फेक्शनपासून सुटका

गरम पाण्यात पाय भिजवल्याने त्वचेची छिद्रे उघडतात, ज्यामुळे घाण आणि डेड स्कीन सहज निघून जाते. यामुळे पायांची त्वचा स्वच्छ आणि निरोगी बनते.

सर्दी आणि खोकल्यापासून आराम

गरम पाण्यात पाय टाकल्याने शरीराला ऊब मिळते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. कोणत्याही औषधाशिवाय सर्दीपासून बचाव करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे.  

टॅग्स : हेल्थ टिप्सपाणीआरोग्यथंडीत त्वचेची काळजी