Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ६ स्वस्त पदार्थ, आहार सुधारा तुमचं हार्ट दगा देणार नाही...

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ६ स्वस्त पदार्थ, आहार सुधारा तुमचं हार्ट दगा देणार नाही...

Simple Ways to Get Rid of Cholesterol : 6 Herbs To Lower Your Cholesterol : Natural Ways to Lower Cholesterol : The best herbs to help lower cholesterol : वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ६ नैसर्गिक उपाय - हृदयाचे कार्य राहील ठणठणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 20:39 IST2025-04-26T20:20:46+5:302025-04-26T20:39:22+5:30

Simple Ways to Get Rid of Cholesterol : 6 Herbs To Lower Your Cholesterol : Natural Ways to Lower Cholesterol : The best herbs to help lower cholesterol : वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ६ नैसर्गिक उपाय - हृदयाचे कार्य राहील ठणठणीत...

Simple Ways to Get Rid of Cholesterol 6 Herbs To Lower Your Cholesterol Natural Ways to Lower Cholesterol The best herbs to help lower cholesterol | बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ६ स्वस्त पदार्थ, आहार सुधारा तुमचं हार्ट दगा देणार नाही...

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ६ स्वस्त पदार्थ, आहार सुधारा तुमचं हार्ट दगा देणार नाही...

कोलेस्टेरॉल ही अशी एक गोष्ट आहे जी वाढल्याने आपल्या शारीरिक कार्यात अडथळे निर्माण होतात. कोलेस्टेरॉल हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण करणारा महत्त्वाचा घटक असल्याने ते (Simple Ways to Get Rid of Cholesterol) वाढू न देणे आवश्यक असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि त्यामुळे हृदयाच्या ( 6 Herbs To Lower Your Cholesterol) कार्यात अडथळा येतो(The best herbs to help lower cholesterol).

आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यातील आरोग्याच्या समस्या नियंत्रणात राहू शकतात. कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर काही नॅचरल उपायांनी देखील ही समस्या दूर केली जाऊ शकते. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण कोणत्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करु शकतो ते पाहूयात. सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर हंसाजी यांनी त्यांच्या युट्युब व्हिडीओमध्ये, शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणत्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करु शकतो याबद्दल सांगितले आहे.   

१. मोरिंगा :- मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या पानांचा पाला. डॉ. हंसाजी यांच्या मते, अनेक रिसर्चचे निकाल असे दर्शवतात की, मोरिंगा खराब कोलेस्ट्रॉल साफ करण्यासाठी उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. मोरिंगामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत करते. याशिवाय, मोरिंगाच्या पानांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. त्यात फायटोस्टेरॉल आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे कोलेस्टेरॉल शोषण रोखतात आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची (HDL) पातळी वाढवतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात मोरिंगा पावडर मिसळून पिऊ शकता.

फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...

२. कोथिंबीर :- कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोथिंबीरच्या पानांना सुपरफूड मानले जाते. कोथिंबीरच्या पानांमध्ये काही घटक असतात जे पित्त आम्लाचा स्राव वाढवतात. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही कोथिंबीरची पाने पाण्यासोबत बारीक करून पिऊ शकता किंवा कोथिंबीरची पाने, सफरचंद आणि आल्याचे तुकडे घालून स्मूदी बनवून पिऊ शकता.

उन्हाळ्यात लालचुटुक कलिंगड खाताच, पण करु नका 'या' ७ चुक! पोटदुखी छळेल आणि...

३. तुळशीची पाने :- तुळशीची पाने कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील नसांमध्ये जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करतात. याशिवाय, तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल असते, जे स्ट्रेस कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते. यासाठी एक ग्लास पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यावर त्यात तुळशीची पाने घाला आणि काही वेळ तसेच राहू द्या. तुम्ही हे पाणी दररोज झोपण्यापूर्वी कोमट करुन पिऊ शकता.

४. दुधी भोपळा :- दुधी भोपळा शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. भोपळ्यामध्ये फायबर असते जे रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यासाठी, मिक्सरमध्ये भोपळ्याचे तुकडे, थोडे आले, जिरे आणि पाणी घालून स्मूदी बनवा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ते प्या. या उपायामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल. 

५. मेथीचे दाणे :- मेथीच्या बियांमध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणावर असते. मेथीच्या दाण्यांमुळे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. याशिवाय, मेथीचे दाणे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी तुम्ही मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिऊ शकता. 

६. गव्हांकुर :- गव्हांकुर म्हणजेच व्हीटग्रास. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी गव्हांकुराचा रस पिणे अधिक फायदेशीर ठरते. गव्हांकुर लिव्हरचे कार्य सुधारण्यास आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. यासाठी, एक ग्लास पाण्यात मूठभर गव्हांकुर घालून ते एकत्रित मिक्सरला फिरवून त्याचा रस तयार करून घ्यावा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हा रस प्यावा.

Web Title: Simple Ways to Get Rid of Cholesterol 6 Herbs To Lower Your Cholesterol Natural Ways to Lower Cholesterol The best herbs to help lower cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.