lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मुलांच्या छातीत कफ झाला? करा ३ पदार्थांचा सोपा घरगुती उपाय, अतिशय असरदार- कफ लवकर कमी होईल 

मुलांच्या छातीत कफ झाला? करा ३ पदार्थांचा सोपा घरगुती उपाय, अतिशय असरदार- कफ लवकर कमी होईल 

Effective And Very Fast Home Remedy For Cough: मुलांना सतत खोकला असेल, छातीत कफ झाल्यासारखा वाटत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2023 02:09 PM2023-09-19T14:09:52+5:302023-09-19T14:10:53+5:30

Effective And Very Fast Home Remedy For Cough: मुलांना सतत खोकला असेल, छातीत कफ झाल्यासारखा वाटत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..

Simple home remedies for cough to children, Ayurvedic solution for cough | मुलांच्या छातीत कफ झाला? करा ३ पदार्थांचा सोपा घरगुती उपाय, अतिशय असरदार- कफ लवकर कमी होईल 

मुलांच्या छातीत कफ झाला? करा ३ पदार्थांचा सोपा घरगुती उपाय, अतिशय असरदार- कफ लवकर कमी होईल 

Highlights२ दिवसांतच कफ मोकळ होईल.

पावसाळ्याचे दिवस म्हटलं की घरात बऱ्याचदा कोणी ना कोणी सर्दी- खोकला- कफ अशा त्रासांनी त्रस्त असतं. मग एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला होतं आणि घरातले सगळेच एकेकदा आजारी पडतात. मोठ्या मंडळींचं तरी एकवेळ ठिक आहे. पण लहान मुलांना जर दुखणं आलं तर ते निस्तरताना त्यांच्या पालकांच्या आणि विशेषत: आईच्या मात्र नाकी नऊ येतात. खोकला, कफ तर लवकर कमी होतच नाहीत आणि अशा आजारांसाठी वारंवार ॲलोपॅथीची औषधं द्यायलाही नको वाटतं (Ayurvedic solution for cough). म्हणूनच हा एक डॉक्टरांनीच सुचविलेला उपाय करून पाहा. दोन दिवसांतच मुलांच्या छातीतला कफ मोकळा होईल. (Simple home remedies for cough to children)

 

हा उपाय dr.nitasha_gupta या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला असून तो करायला अगदी सोपा आहे. मुलांना कफचा त्रास झाल्यास सुरुवातीचे दोन- तीन दिवस हा उपाय करून पाहायला हरकत नाही.

जुही परमारने लेकीसोबत बनवला कणकेचा बाप्पा, ५ मिनिटांत साकारली गणरायाची सुबक मुर्ती- व्हिडिओ व्हायरल

पण फरक पडतच नाहीये किंवा कफ खूपच जास्त असेल तर मात्र ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा उपाय करण्यासाठी आपल्या आपल्या स्वयंपाक घरातलेच ३ पदार्थ लागणार आहेत. ते कोणते पदार्थ आणि नेमका कसा उपाय करायचा, ते आता पाहूया... 

 

मुलांना कफ झाल्यास घरगुती उपाय

१. हा उपाय करण्यासाठी २ टेबलस्पून मोहरीचं तेल, लसूणाची एक मोठी पाकळी आणि पाव चमचा ओवा हे ३ पदार्थ लागणार आहेत.

२. सगळ्यात आधी फोडणीची असते ती लहान कढई गॅसवर तापायला ठेवा आणि त्यात तेल टाका.

पावसाळ्यात कुंडीतली माती शेवाळली- हिरवीनिळी झाली? लवकर करा ३ गोष्टी, नाहीतर झाडं जातील कोमेजून

३. लसूणाची पाकळी किसून घ्या किंवा बारीक ठेचून घ्या. लसूण पाकळी खूपच लहान असेल तर २ घेतल्या तरी चालतील.

४. कढईतलं तेल गरम झालं की त्यात लसूण पेस्ट आणि ओवा टाका. तेल कडक होऊ देऊ नये.

५. लसूण लालसर रंगाचा झाला की गॅस बंद करा. आता हे तेल गाळून घ्या आणि कोमट झालं की त्या तेलाने मुलांच्या तळपायाला मालिश करा. तसेच थोडंसं तेल छातीलाही लावा. २ दिवसांतच कफ मोकळ होईल. 

 

Web Title: Simple home remedies for cough to children, Ayurvedic solution for cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.