Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भांडी घासण्यासाठी तुम्हीही डिशवॉश लिक्विड वापरता? डॉक्टर सांगतात शरीरावर होणारे त्याचे ३ मोठे दुष्परिणाम

भांडी घासण्यासाठी तुम्हीही डिशवॉश लिक्विड वापरता? डॉक्टर सांगतात शरीरावर होणारे त्याचे ३ मोठे दुष्परिणाम

Side Effects of Using Dishwash Liquid: भांडी घासण्यासाठी हल्ली घरोघरी डिशवॉश लिक्विड वापरलं जातं. ते वापरणं आरोग्यासाठी कसं घातक ठरतंय ते पाहा...(health risk in using dishwash liquid)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2026 09:35 IST2026-03-29T09:30:48+5:302026-03-29T09:35:02+5:30

Side Effects of Using Dishwash Liquid: भांडी घासण्यासाठी हल्ली घरोघरी डिशवॉश लिक्विड वापरलं जातं. ते वापरणं आरोग्यासाठी कसं घातक ठरतंय ते पाहा...(health risk in using dishwash liquid)

side effects of using dishwash liquid, health risk in using dishwash liquid | भांडी घासण्यासाठी तुम्हीही डिशवॉश लिक्विड वापरता? डॉक्टर सांगतात शरीरावर होणारे त्याचे ३ मोठे दुष्परिणाम

भांडी घासण्यासाठी तुम्हीही डिशवॉश लिक्विड वापरता? डॉक्टर सांगतात शरीरावर होणारे त्याचे ३ मोठे दुष्परिणाम

भांडी घासण्याच्या साबण काही वर्षांपुर्वीपर्यंत अगदी घरोघर वापरल्या जायच्या. आता मात्र बहुतांश घरांमध्ये त्यात बदल झाला आहे. भांड्यांसाठीची साबण जाऊन त्या जागी आता लिक्विड डिशवॉश आले आहे. साबण वापरण्याचा एक फायदा म्हणजे साबणाचे कण जर भांड्याला राहिले तर ते लगेच दिसून येतात. शिवाय भांडी नीट विसळली गेली नाही तर त्याचा साबणाचा पांढरट थर भांड्यांवर दिसू लागतो. त्यामुळे मग अशी भांडी लगेच पुन्हा स्वच्छ करणं सोपं होतं. पण लिक्विड डिशवॉशच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. त्याचे काही अंश जरी विसळलेल्या भांड्यांवर राहिले तरी ते दिसून येत नाहीत. त्यामुळेच भांड्यांसाठी डिशवॉश लिक्विड वापरणं अतिशय धोकादायक असून त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती....(Side Effects of Using Dishwash Liquid)

 

डिशवॉश लिक्विड वापरल्याने शरीरावर होणारे वाईट परिणाम

ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मनन वोरा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार डिशवॉश लिक्विड हे जणू काही एखाद्या विषारी घटकाप्रमाणे काम करतं. कारण त्यामध्ये असणारं आयसोथियाजोलिनॉन्स हे बॅक्टेरिया मारण्यासाठी जरी उपयुक्त ठरत असलं तरी त्याचा मानवी शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. 

रात्रीच्या जेवणासाठी करा कोकोनट राईस, उन्हाळ्यात पोटाला गारवा देणारा पदार्थ- करायलाही अगदी सोपा

जर्नल ऑफ द अमेरिकन एकेडमी ऑफ डर्मेटोलॉजी यांनीही याविषयी एक अभ्यास केला असून यामध्ये असं सांगितलं आहे की या लिक्विडचा त्रास तुमच्या त्वचेलाही होतो. त्वचा कोरडी पडणं, रॅशेस येणं, त्वचेला सतत खाज येणं असे त्रास संवेदनशील त्वचा असणाऱ्या लोकांना होऊ शकतात. 

 

युरोपमधील सायंटिफिक कमिटी ऑन कंझ्युमर सेफ्टी यांच्या अभ्यासानुसार या लिक्विडमधले हानिकारक घटक वारंवार पोटात गेल्यास पचनाशी संबंधित आतड्यांचे गंभीर त्रासही होऊ शकतात.

वर्षांनुवर्षे जुने पिगमेंटेशन ३० दिवसांत होतील गायब, लावा पपईचा 'हा' फेसमास्क, त्वचा होईल नितळ- स्वच्छ

शिवाय हार्मोन्सचे संतुलनही बिघडते. त्यामुळे डिशवॉश लिक्विड वापरताना खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. भांडी धुताना हलगर्जीपणा करू नये. तसेच वरवर भांडी न धुता व्यवस्थित चोळून धुवावी. योग्य तेवढं पाणी घेऊन स्वच्छ विसळावी.

 

Web Title : डिशवॉश लिक्विड के खतरे: डॉक्टर ने स्वास्थ्य पर हानिकारक प्रभावों की चेतावनी दी।

Web Summary : डिशवॉश लिक्विड सुविधाजनक होने पर भी अवशेष छोड़ सकते हैं। विशेषज्ञों का चेतावनी है कि आइसोथियाज़ोलिनोन जैसे रसायन त्वचा की समस्याओं, पाचन समस्याओं और हार्मोनल असंतुलन का कारण बन सकते हैं। स्वास्थ्य जोखिमों से बचने के लिए अच्छी तरह से धो लें।

Web Title : Dishwash liquid dangers: Doctors warn of harmful effects on health.

Web Summary : Dishwash liquids, though convenient, can leave residues. Experts warn that chemicals like isothiazolinones may cause skin issues, digestive problems, and hormonal imbalances. Rinse thoroughly to avoid health risks.