ऑस्ट्रेलिया विरूद्ध तिसऱ्या वन डे (Ind Vs Aus Odi) सामन्यादरम्यान टिम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दुखापत झाली. रुग्णालयात भरती केल्यानंतर श्रेयसला सप्लीन इंज्युरी असल्याचं सांगितलं जात आहे. बीसीसीआयच्या रिपोर्टनुसार श्रेयसला स्प्लीन लॅसरेशन झाले आहे. ज्यामुळे इंटरनल ब्लिडींगसुद्धा झाले आणि आय.सी.यूमध्ये ठेवण्याची वेळ आली.(Shreyas Iyer Suffers Spleen Injuiry During Ind Vs Aus Odi What The Speen do Knows Its Roles)
सध्या श्रेअर (Shreyas Iyer) अय्यरची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून रिकव्हरी स्टेजमध्ये आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला आहे की स्प्लीन म्हणजे नक्की काय, या अवयवाचे काम नक्की काय असते. या भागाला दुखापत झाल्यास काय धोका असतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
हा अवयव कुठे असतो, त्याचं काम काय? (What Speen do Knows Its Roles)
युएसच्या क्लिव्हलँण्ड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार स्प्लीन शरीराच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांच्या खाली आणि पोटाच्या वरच्या भागाचा एक छोटासा अवयव आहे. स्प्लीनचं मुख्य कार्य शरीरातील रक्त फिल्टर करण्याचं असतं. स्प्लीन जुन्या म्हणजे डॅमेज बल्ड सेल्सला हटवून शरीराला संक्रमणापासून वाचवण्यासाठी नवीन व्हाईट ब्लड सेल्स तयार करतो.
स्प्लीन शरीराच्या इम्यून सिस्टीमचा एक महत्वपूर्ण भाग आहे. रक्तातील व्हायरस, बॅक्टेरियांना ओळखून त्यांच्यांशी लढणं हे त्याचे काम असते. स्प्लीन रक्त जमा करून ठेते. गरज पडल्यानंतर स्प्लीन शरीराला रक्ताचा पुरवठा करते. जखम झाल्यानंतर किंवा अपघात झाल्यास, शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास स्प्लीनमधील रिसर्व्ह ब्लड कामी येते.
स्प्लीन लॅसरेशन म्हणजे काय? (Spleen laceration injury)
जेव्हा एखादी व्यक्ती जोरदार धक्का लागून पडते तेव्हा स्प्लीनमध्ये भेगा पडतात किंवा स्प्लीन फाटू शकते. स्प्लीनला काहीही दुखापत झाल्यास त्याला स्प्लीन लॅसरेशनस म्हणतात. ही एक वैद्यकीय आपातकालीन स्थिती असून इंटरनल ब्लिडींग वाढल्यास रुग्णांची स्थिती गंभीर होऊ शकते आणि मृत्यूचा धोका असतो.
पोहे गचगचीत होतात तर कधी वातड लागतात? ७ टिप्स, मऊ-मोकळे चवदार पोहे होतील घरीच
स्प्लीनमध्ये साधारण दुखापत झाल्यात डॉक्टर बेड रेस्ट किंवा मॉनिटरिंगचा सल्ला देतात. ब्लिडींग जास्त झाल्यास सर्जरीसुद्धा करावी लागू शकते. ज्याला स्प्लीनेक्टॉमी म्हणतात.डॉक्टरांच्या निर्देशनानुसार हेल्दी डाएट, व्यायाम,आराम करणं गरजेचं आहे. पोटदुखी, थकवा,अशक्तपणा यांसारखी लक्षणं दिसल्यास त्वरीत वैद्यकीय चाचणी करा.
Web Summary : Shreyas Iyer suffered a spleen injury during the India-Australia ODI. The spleen filters blood, produces white blood cells, and stores blood. Spleen laceration, a tear in the spleen, requires immediate medical attention. Treatment ranges from rest to surgery.
Web Summary : ऑस्ट्रेलिया के खिलाफ वनडे में श्रेयस अय्यर को स्प्लीन में चोट लगी। स्प्लीन रक्त को फिल्टर करता है, श्वेत रक्त कोशिकाएं बनाता है, और रक्त का भंडारण करता है। स्प्लीन का फटना एक आपातकालीन स्थिति है, जिसका इलाज आराम से लेकर सर्जरी तक है।