Japanese People Health Secret : जपानमधील लोक हे जगात सगळ्यात हेल्दी जीवनासाठी आणि जास्त काळ जगण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या लाइफस्टाईलबाबत आणि आरोग्याबाबत नेहमीच चर्चा होत असते. येथील लोक सरासरी ८४ ते ९० वर्षापर्यंत जगतात. महत्वाची बाब म्हणजे म्हातारपणात देखील ते फिट, निरोगी राहतात. अशात त्यांच्या या फिटनेसचं सीक्रेट सगळ्यांनाच जाणून घ्यायचं असतं. मुळात त्यांची तब्येत आणि जास्त जगण्याची गुपित त्यांच्या जेनेटिक्समध्ये नाही तर त्यांच्या डाएट, सवयी आणि विचार यात लपलेलं असतं. खास बाब ही आहे की, ते रोज भरपूर प्रमाणात भात खातात. तरीही लठ्ठ होत नाही आणि ना त्यांना लाइफस्टाईलसंबंधी काही गंभीर आजार होतात. हे असं कसं होतं?
भात आहे मुख्य जेवण
जपानमधील लोकांचं मुख्य जेवण हे भात असतं. सकाळी नाश्त्यात, दुपारी आणि रात्री प्रत्येक जेवणात भात असतोच असतो. पण ते भात नेहमीच नॉर्मल आणि कमी तेल-मिठासोबत खातात. त्यासोबत हलकं सूप, भाज्या, मासे आणि लोणचं खातात. म्हणजे भाताचं प्रमाण भलेही जास्त असेल, पण ते संतुलित आणि कमी कॅलरी असलेला आहार घेतात.
संतुलित आणि पोषक आहार
जपानमधील लोकांचं जेवण कमी असतं, पण त्यात सगळ्याच गोष्टी असतात. मिसो सूप (फर्मेंटेड सोयाबीनपासून बनवलेलं) जे गट हेल्थ सुधारतं. सी वीड आणि हिरव्या पालेभाज्या, ज्यात मिनरल्स आणि फायबर भरपूर असतं. सी-फूड ज्यातून हृदयसाठी फायदेशीर ओमेगा ३ फॅटी अॅसिड मिळतं. टोफू आणि सोया प्रॉडक्ट्स, जो हलके असतात आणि प्रोटीन भरपूर देतात. तर ग्रीन टी मधील अॅंटीऑक्सीडेंटने इम्युनिटी वाढते.
"हारा हाची बू"
जपानी संस्कृतीमध्ये एक खास नियम आहे. तो म्हणजे ‘हारा हाची बू’, म्हणजेच हे लोक पोट केवळ ८० टक्के भरेपर्यंतच खातात. असं करून ते ओव्हरईटिंगचा धोका टाळतात. तसेच या नियमाने पचन तंत्रावर दबाव पडत नाही आणि शरीरात फॅट जमा होत नाही.
अॅक्टिव आणि शिस्तबद्ध जीवन
जपानी लोक भरपूर पायी चालतात, सायकलिंग करतात आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. घरातील कामे करण्यात अॅक्टिव राहतात. याचा प्रभाव थेट मेटाबॉलिज्म आणि फिटनेसवर दिसून येतो.
लठ्ठपणाचा दर कमी
जपानमध्ये लठ्ठपणा जगात सगळ्यात कमी आढळो. संतुलित आहार, कमी प्रमाणात जेवण आणि अॅक्टिव लाइफस्टाईलमुळे तिथे डायबिटीस, हृदयरोग आणि ब्लड प्रेशर यांसारखे आजार कमी बघायला मिळतात.
