Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मका भाजून खावा की उकडवून? डॉक्टर सांगतात, 'या' पद्धतीने मका खाल्ल्यास मिळते संपूर्ण पोषण...

मका भाजून खावा की उकडवून? डॉक्टर सांगतात, 'या' पद्धतीने मका खाल्ल्यास मिळते संपूर्ण पोषण...

Roasting Or Boiling Which Is The Right Way To Consume Corn : What is the best way to consume corn : भाजलेला मका खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे की उकडलेला? पाहा तज्ज्ञ नेमकं काय सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 17:32 IST2025-06-21T17:18:36+5:302025-06-21T17:32:31+5:30

Roasting Or Boiling Which Is The Right Way To Consume Corn : What is the best way to consume corn : भाजलेला मका खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे की उकडलेला? पाहा तज्ज्ञ नेमकं काय सांगतात...

Roasting Or Boiling Which Is The Right Way To Consume Corn What is the best way to consume corn | मका भाजून खावा की उकडवून? डॉक्टर सांगतात, 'या' पद्धतीने मका खाल्ल्यास मिळते संपूर्ण पोषण...

मका भाजून खावा की उकडवून? डॉक्टर सांगतात, 'या' पद्धतीने मका खाल्ल्यास मिळते संपूर्ण पोषण...

पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. धो - धो कोसळणाऱ्या पावसात गरमागरम मक्याचे कणीस खाण्याची मज्जा काही औरच असते. पावसाळ्यात छान पिवळेधम्मक, टपोरे दाणे असणारे मक्याचे कणीस खाल्ल्याशिवाय पावसाळा सुरु झाला असे वाटतच नाही. मक्याचे कणीस खाण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कुणाला मका (What is the best way to consume corn) भाजून खायला आवडतो तर कुणाला उकडवून खायला आवडतो. परंतु, मका उकडवून खाणे किंवा तो भाजून खाणे या दोन्हींपैकी मला खाण्याची सर्वात योग्य आणि फायदेशीर पद्धत कोणती असा प्रश्न आपल्याला पडतो. खरंतर, मका हा कोणत्याही सुपरफूड पेक्षा कमी नाही. मका खाल्ल्याने त्याचे अनेक आरोग्यदायी  फायदे आपल्या शरीराला मिळतात(Roasting Or Boiling Which Is The Right Way To Consume Corn).

भाजलेला मका खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे की उकडलेला? कोणती पद्धत मक्यातील पोषकद्रव्यं अधिक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवते? वजन कमी करणाऱ्यांसाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी आणि पचनशक्तीसाठी कोणत्या पद्धतीने मका खाणं योग्य आहे? याबद्दल अधिक माहिती, मुंबईतील केटी क्लिनिकच्या आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. अंजू मंकणी यांनी onlymyhealth.com या वेबसाईटला दिली. 

मका भाजून खावा की उकडवून ? 

तज्ज्ञांच्यामते, मका भाजणे आणि उकडवणे या दोन्ही पद्धती फायदेशीर आहेत. प्रत्येकजण त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार आणि आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतींनी खाऊ शकतात. 

मका उकडवून खाण्याचे फायदे... 

उकडलेला मका खाल्ल्याने त्यातील व्हिटॅमिन 'सी' आणि व्हिटॅमिन 'बी' सारखे सॉल्यूबल न्यूट्रियन्स आणि उष्णतेमुळे नष्ट होणारी पोषकद्रव्ये कमी होतात. कारण उकळण्याच्या प्रक्रियेत ही जीवनसत्त्वे पाण्यात विरघळून जाऊ शकतात. मात्र, वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी उकडलेला मका हा एक चांगला पर्याय ठरतो. कारण तो पचनासाठी जड असतो आणि त्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर पोट बराचकाळ भरल्यासारखे वाटते. यामुळे लवकर भूक लागत नाही आणि अनावश्यक खाणे टाळता येते, जे वजन कमी करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

कोरडा खोकला खूप? नागवेलीच्या पानांच्या घरगुती औषधाने ढास होते कमी, घ्या डॉक्टरांचाही सल्ला...

मका भाजून खाण्याचे फायदे... 

मका भाजून खाल्ल्यास त्यामधील सॉल्यूबल न्यूट्रियन्स आणि उष्णतेमुळे नष्ट होणारी पोषकद्रव्ये टिकून राहतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात मिळतात. भाजलेला मका पचनसंस्थेसाठी फायदेशीर असून पोट साफ होण्यास मदत होते. तसेच हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठीही भाजलेला मका अधिक फायदेशीर मानला जातो. मात्र, भाजल्यामुळे तो थेट उष्णता आणि धुराच्या संपर्कात येतो, ज्यामुळे त्यात काही प्रमाणात कर्करोगकारक संयुगे तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अत्यधिक प्रमाणात भाजलेला मका खाणे टाळावे. योग्य प्रमाणात आणि मध्यम आचेवर भाजलेला मका शरीरासाठी पोषणदायी आणि फायदेशीर ठरतो.

चुकूनही ‘या’ ७ भाज्या शिजतांना पाणी घालू नका, करा वाफेवर! नाहीतर भाजी होईल बेचव...

मका भाजून की उकडवून नेमका कोणत्या पद्धतीने खावा ? 

तज्ज्ञांच्या मते, मका उकडवून किंवा भाजून खाण्यापेक्षा तो वाफेवर शिजवून खाणे अधिक फायदेशीर मानले जातात. वाफवण्याची पद्धत आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून, या प्रक्रियेत मक्यामधील पोषक घटक कायम जसेच्या तसे टिकून राहतात. त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स नष्ट होत नाहीत.

वाफवलेला मका खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, कारण तो पचनासाठी थोडा जड असतो आणि पोट भरल्यासारखं वाटतं. याशिवाय वाफवलेला मका पचनसंस्थेसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील लाभदायक ठरतो. यासाठीच, मका भाजून किंवा उकडवून खाण्यापेक्षा तो वाफवून खाणे अधिक फायदेशीर मानले जाते.

Web Title: Roasting Or Boiling Which Is The Right Way To Consume Corn What is the best way to consume corn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.