Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देते ही पांढरी वस्तू; हाडांना ५ पट जास्त ताकद येईल, दातही होतील स्वच्छ

दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देते ही पांढरी वस्तू; हाडांना ५ पट जास्त ताकद येईल, दातही होतील स्वच्छ

Right Use Of Seasome Seeds For Strong Bone : काळे तीळ, सुकं नारळ, भोपळ्याच्या बिया, आळशीच्या बिया, आवळा पावडर एकत्र मिसळून याची पावडर बनवून ठेवा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 19:03 IST2024-12-28T18:36:08+5:302024-12-28T19:03:41+5:30

Right Use Of Seasome Seeds For Strong Bone : काळे तीळ, सुकं नारळ, भोपळ्याच्या बिया, आळशीच्या बिया, आवळा पावडर एकत्र मिसळून याची पावडर बनवून ठेवा.

Right Use Of Seasome Seeds For Strong Bones And Teeth Which Gives 5 Times More Calcium Than Milk | दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देते ही पांढरी वस्तू; हाडांना ५ पट जास्त ताकद येईल, दातही होतील स्वच्छ

दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देते ही पांढरी वस्तू; हाडांना ५ पट जास्त ताकद येईल, दातही होतील स्वच्छ

तीळ खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. आयुर्वेदापासून आहारतज्ज्ञांपर्यंत सर्वचजण थंडीत तीळ खाण्याचा सल्ला देतात. तीळ गरम असतात, तिळाच्या सेवनानं आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. मूठभर तिळ एक ग्लास दुधात घालून प्यायल्यानं त्यातून ५ टक्के जास्त कॅल्शियम मिळते. तिळाचा वापर करून तुम्ही हाडं मजबूत बनवू शकता. आयुर्वेदीक एक्सपर्ट रोबिन शर्मा यांच्यामते मूठभर तीळानं पालक आणि डार्क चॉकलेट खाण्याप्रमाणेच फायदे मिळतात. (Right Use Of Seasome Seeds For Strong Bones And Teeth Which Gives 5 Times More Calcium Than Milk)

२ पद्धतींचा अवलंब केल्यास आयुष्यभर याचे फायदे मिळतील. जर तुमचे दात कमकुवत असतील तर तिळाच्या  सेवनानं दात  चांगले राहतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तीळ  खाल्ल्यानं वेळेआधीच केस पांढरे होणं बंद होतं आणि केसांमध्ये नवीन जीव येतो. (Right Use Of Seasome Seeds For Strong Bone)

हाडांना मजबूत बनवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. तिळात दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम असते.  ज्यामुळे हाडं चांगली राहतात. या छोट्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. मूठभर तिळाच्या बिया १०० ग्राम पालकाइतकं आयर्न देतात आणि अनेक डार्क चॉकलेट्स जितकं मॅग्नेशियम, आयर्न रक्त बनवण्यासाठी आवश्यक  असते. मॅग्नेशियम हार्ट, मेंदू आणि झोपचे चक्र सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. 

तूप खाल्ल्यानं वजन वाढतं का? तुपाचे सेवन आणि वजन वाढ यांचा काय संबंध आहे, समजून घ्या.....

या पदार्थांसोबत तीळ खा

काळे तीळ, सुकं नारळ, भोपळ्याच्या बिया, आळशीच्या बिया, आवळा पावडर एकत्र मिसळून याची पावडर बनवून ठेवा. १ चमचा दिवसातून २ ते ३ वेळा महिनाभर खा, हिवाळ्यात हे खाल्ल्यानं केसांना नवीन जीवन मिळेल, केसाचं तुटणं थांबेल आणि केस वेळेआधीच पांढरे होणं थांबेल.

ओरल हेल्थ चांगली राहते

तिळाचे तेल तोंडात ठेवून ५ ते १० मिनिटांसाठी तोंडात फिरवा. त्यानंतर गुळण्या करा. हा उपाय केल्यास तोंडातून दुर्गंध येणार नाही. पायरीयाची समस्या, हिरड्या सुजणं, दात हलणं जाणवणार नाही. हा उपाय करून तुम्ही तुमची ओरल हेल्थ चांगली ठेवू शकता. दात काळे-पिवळे होण्यापासून बचाव होईल.

Web Title: Right Use Of Seasome Seeds For Strong Bones And Teeth Which Gives 5 Times More Calcium Than Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.