लहान मुलांची दिवसभर दंगा- मस्ती चाललेली असते. ते खेळण्यामध्ये इकडे तिकडे पळण्यामध्ये एवढे गुंग होत जातात की त्यांचे कुठेच लक्ष नसते. रात्री अंथरुणावर पडल्यानंतर मग त्यांनाही काही गाेष्टींची जाणीव व्हायला लागते. त्यात सगळ्यात पहिल्यांदा जाणवणारी गोष्ट म्हणजे पायांचं दुखणं. काही लहान मुलं सतत त्यांच्या पालकांकडे पाय दुखण्याची तक्रार करतात. एवढंच नाही तर पाय इतके जास्त दुखत असतात की आई- वडिलांना नेहमीच मुलांचे पाय दाबून द्यावे लागतात. मुलांनी दिवसभर धिंगाणा घातला म्हणून त्यांचे पाय दुखत असतील असं आई- बाबांना वाटणं साहजिक आहे. पण त्यामागे फक्त तेवढंच एक कारण नाही. मुलांचे पाय दुखण्यामागे कित्येक वेगवेगळी कारणं आहेत. ती नेमकी कोणती आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतात ते पाहूया..(causes and remedies for leg pain in kids)
लहान मुलांचे पाय दुखण्यामागची कारणं..
लहान मुलांचे पाय दुखण्यामागे काय काय कारणं असू शकतात याची माहिती डॉक्टरांनी shree_child_care_clinic या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
१. लहान मुलं खूप जास्त ॲक्टीव्ह असतात. त्यांची दिवसभर पळापळ सुरू असते. त्यामुळे स्नायूंना थकवा येऊन त्यांना पायदुखीचा त्रास होऊ शकतो.
२. लहान मुलांच्या पायदुखीचं कारण डिहायड्रेशन हे देखील असू शकतं. कारण बरीच लहान मुलं पाणी कमी पितात. कोरडं अन्न जास्त खातात. खेळण्याच्या नादात पाणी पिणं त्यांच्या लक्षात राहात नाही. यामुळेही मसल्सला थकवा येऊन पाय दुखू शकतात.
३. संतुलित आहार आणि फळांचा अभाव यामुळेही पाय दुखू शकतात.
४. लहान मुलांच्या हाडांची सतत वाढ होत असते. हाडं वाढल्यामुळे आजुबाजुचे स्नायूही ताणले जातात. त्यामुळेही अनेक मुलांचे पाय दुखतात.
५. कॅल्शियम, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही स्नायुंना थकवा जाणवू शकतो.
६. मुलांची पायदुखी थांबावी यासाठी त्यांना पुरेसं पाणी, आहार द्या. तसेच दररोज रात्री झोपण्यापुर्वी तिळाच्या तेलाने मुलाच्या पायांना मालिश करा.
लाकडी पोळपाट- लाटणं काळपट हिरवं होऊन चिकट झालं? १ उपाय- पोळपाट लाटणं होईल स्वच्छ
मुलांची पायदुखी थांबविण्यासाठी उपाय
मुलांची पायदुखी थांबावी यासाठी त्यांना पुरेसं पाणी, आहार द्या. तसेच दररोज रात्री झोपण्यापुर्वी तिळाच्या तेलाने मुलाच्या पायांना मालिश करा. गरम पाण्याची पिशवी घेऊन मुलांचे पाय शेकून काढा. योगा, स्ट्रेचिंग असे व्यायाम मुलांकडून करून घ्या.