Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? 'या' ३ पद्धतींनी खा, त्रासच नाही...

सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? 'या' ३ पद्धतींनी खा, त्रासच नाही...

Raw Veggies Feel Boring or Bloating Try These 3 Fun, Gut-Friendly Ways :3 Ways to Eat More salad even if you don't like them : सॅलेड खायला अनेकांना आवडत नाही, यासाठीच पाहा सॅलेड खाण्याच्या ३ वेगळ्या पद्धती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2025 17:12 IST2025-05-03T16:51:39+5:302025-05-03T17:12:19+5:30

Raw Veggies Feel Boring or Bloating Try These 3 Fun, Gut-Friendly Ways :3 Ways to Eat More salad even if you don't like them : सॅलेड खायला अनेकांना आवडत नाही, यासाठीच पाहा सॅलेड खाण्याच्या ३ वेगळ्या पद्धती...

Raw Veggies Feel Boring or Bloating Try These 3 Fun, Gut-Friendly Ways 3 Ways to Eat More salad even if you don't like them | सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? 'या' ३ पद्धतींनी खा, त्रासच नाही...

सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? 'या' ३ पद्धतींनी खा, त्रासच नाही...

सॅलेड पौष्टिक असल्याने रोजच्या आहारात ते असणे गरजेचेच असते. डाएटमध्ये सॅलेड खाण्याचा सल्ला जातो. सॅलेड खाण्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे देखील मिळतात. साधरणतः भाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने सॅलेड करता येते. सॅलेडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणांत असतात. सॅलेड खाल्ल्याने त्यातून आपल्या शरीराला (Raw Veggies Feel Boring or Bloating Try These 3 Fun, Gut-Friendly Ways) आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात, परंतु सॅलेड  खाण्याचे अनेक फायदे असूनही आपल्यापैकी बऱ्याचजणांना सॅलेड  खायला आवडत नाही(3  Ways to Eat More salad even if you don't like them).

सॅलेड म्हटलं की काहीजण नाकं मुरडतात, नकोच म्हणतात. सॅलेड करायचं म्हटलं की शक्यतो आपण सगळ्या कच्च्या भाज्याच कापून सॅलेड करतो किंवा काहीजण भाज्या हलके उकडवून घेतात. यामुळेच बऱ्याचजणांना असे कच्चे आणि चवीला बेचव लागणारे सॅलेड आवडत नाही. यासाठी, आपण सॅलेड नेमकं कोणत्या ३ वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकतो ते पाहूयात. 

सॅलेड खायला आवडत नाही? मग या ३ वेगळ्या पद्धतीने सॅलेड खाऊन पाहा... 

१. सॅलेड हलकेसे परतून घ्यावे :- जर तुम्हांला कच्चे किंवा उकडवून तयार केलेलं सॅलेड खायला आवडत नसेल तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. आपण सॅलेड हलकेसे पॅनमध्ये परतवून मग खाऊ शकता. यासाठी सर्वात आधी तुमच्या आवडत्या भाज्यांचे सॅलेड  तयार करून घ्यावं. मग थेट हे एका पॅनमध्ये घालूंन परतवून घ्यावे आणि मग खावे. यामुळे सॅलेड अगदी लवकर पचते याचबरोबर, ब्लोटिंग किंवा पोटदुखीची समस्या त्रास देत नाही. इतकेच नाही तर या पद्धतीने सॅलेड खाल्ल्याने त्यातील सगळी पोषणमूल्ये योग्य प्रकारे आणि सहजरित्या शरीरात शोषली जातात. 

वेटलॉससाठी सातूचे पीठ खाण्याचे योग्य प्रमाण आणि पद्धत पाहा, डाएटिशियन सांगतात वजनात दिसेल फरक...

२. दही - मसाले घालून रायतं करा :- कच्चे सॅलेड खायला आवडत नसेल तर आपण त्यात दही - मसाले घालून त्याच पौष्टिक रायतं करून खाऊ शकतो. यासाठी सर्वातआधी आपल्या आवडत्या भाज्या चिरुन त्यांचे बारीक तुकडे करा किंवा भाज्या किसून देखील घालू शकता. त्यानंतर यात घरी तयार केलेलं घट्ट - दाटसर दही घालावं. वरून आपण चाट - मसाला किंवा लाल तिखट देखील भुरभुरवून घालू शकता. अशाप्रकारे आपण सॅलेडमध्ये दही मिसळून त्याच रायतं करून देखील खाऊ शकता. दह्यामुळे सॅलेडचे पोषणमूल्य अधिक वाढते, दह्यातून प्रोबायोटिक्स देखील मिळतात. 

काळे की पांढरे? वजन कमी करण्यासाठी कोणते चिया सीड्स आहेत खास - वेटलॉस होईल भरभर...

३.व्हेजी डिप :- सॅलेड खायला आवडत नसेल तर आपण त्याचे व्हेजी डिप तयार करून खाऊ शकतो. यासाठी सॅलेड आधी पॅनमध्ये हलकेसे परतून घ्यावे, त्यानंतर मिक्सरमध्ये हे परतून घेतलेलं सॅलेड आणि किंचित पाणी घालूंन त्याचे व्हेजी डिप तयार करून घ्यावे. हे व्हेजी डिप आपण चपाती किंवा भातासोबत अगदी सहजपणे खाऊ शकता.   

अशाप्रकारे जर तुम्हाला कच्चे सॅलेड खायला आवडत नसेल किंवा ब्लोटिंग पोटदुखीची समस्या सतावत असेल तर आपण या ३ नव्या पद्धतीने सॅलेड खाऊ शकता.


Web Title: Raw Veggies Feel Boring or Bloating Try These 3 Fun, Gut-Friendly Ways 3 Ways to Eat More salad even if you don't like them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.