लोक आपल्या यशाचं श्रेय आपल्या जवळपासच्या लोकांना देतात. पण बॉलिवूडचा चॉकलेट बॉय मॅडी म्हणजेच अभिनेता आर. माधवन याचे याबाबतीत काही वेगळंच म्हणणं आहे. अभिनेता आर. माधवन आपल्या पर्सनल लाईफबाबत बराच चर्चेत असतो. त्यांनी सांगितलं की, यश मिळवण्यामागे त्यांच्या मेहनतीचेसुद्धा फार महत्व आहे. आपण जे काही खातो याचा सरळ परिणाम आपलं व्यक्तीमत्व आणि व्यवहारावर होतो. आर. माधवन यांनी काही डाएट रूल्स सांगितले आहेत. जे फॉलो करून तुम्ही चांगली शरीरयष्टी बनवू शकता. (R. Madhvan Shares Food Rules For Carrer Success Every Child Must Try)
अभिनेता सांगतो की जेवण आपल्या सेल्फ ग्रोथमध्ये फार मदत करते. यासाठी काही खाताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तुम्ही काय खाता, कसं खाता. तुम्ही आता जे खात आहात त्यात काही सुधारणा होऊ शकते का याबाबत विचार करायला हवा. योग्य खाण्यापिण्याच्या पदार्थांची निवड करणं खूप महत्वाचं आहे.
पॉझिटिव्ह इटींगचा परिणाम
अभिनेता सांगतो की आपल्या पर्सनल लाईफ व्यतिरिक्त प्रोफेशनल लाईफवरही याचा परिणाम होतो. चित्रपटांमध्ये एक्टिंगदरम्यान पॉझिटिव्ह रोल निभावण्याासठी पॉझिटिव्ह इंटिंगचा आधार घेतला जातो. तर निगेटिव्ह रोल्समध्ये असंतुलित आणि अनियमित भोजनाची मुख्य भूमिका असते.
मानसिक आरोग्यावर परिणाम होतो
आपण विचार करतो की खाण्यामुळे फक्त आपल्या फिजिकल हेल्थवर चांगला परिणाम होतो. अभिनेता सांगतो की खाण्याचा सरळ परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही होतो. चांगलं खाल्ल्यानं आपल्या मेंदूला चांगला संदेश मिळतो ज्यामुळे आपल्याला कोणाशी कसे वागावे याबाबत कळते.
विचार करण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो
प्राचीन शास्त्रांमध्ये जेवणाबाबत अनेक मान्यता आहेत. अभिनेत्याला याबाबत विश्वास वाटतो. यानुसार व्यक्तीचे चरित्र आणि कामांवरही याचा परिणाम होतो. इतिहासात पाहिले तर प्रत्येक युद्धात खाण्याची वेगवेगळी भूमिका होती. अभिनेत्यानं महाभारताचं उदाहरण देत सांगितले की, योद्ध्यांनी अनेक नियमांचे पालन केले होते. म्हणूनच प्रत्येक मुलानंं खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला हव्यात.