Join us

कडूनिंब आणि खडीसाखरेचं औषध ठेवते अनेक आजारांना दूर, त्वचाही होते नितळ आणि मऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:56 IST

PM Narendra Modi Eats Neem Leaves And Mishri : आयुर्वेदानुसार बडिशेपेची चव गोड असते. याच्या सेवनानं खोकल्यापासून आराम मिळतो. इ्म्युनिटी मजबूत होते.

कडूनिंब कडू असला तरी तो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. कडूनिंबात एंटी ऑक्सिडेंट्स, एंटीबॅक्टेरिअल, एंटी इफ्लेमेटरी गुण असतात. यातील हर्ब्स रक्त शुद्ध ठेवतात. पचनक्रिया चांगली राहते आणि त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते. याचे सेवन केल्यानं पुळ्या, खाज येणं या समस्या टाळण्यास मदत होते. (What Happens To Your Body If You Consume Neem And Rock Sugar Daily)

कडूनिंबाचे सेवन केल्यानं ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि लिव्हरचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.  कडूनिंबाची पानं, फुलं यांचा ज्यूस किंवा काढा आयुर्वेदात इम्युनिटी वाढवण्यासाठी, क्रोनिक आजार बरे करण्यासाठी आणि शरीरात स्वच्छता  ठेवण्यासाठी नियमित वापरले जातात.  खडीसाखरेसोबत कडूनिंबाचे सेवन केल्यानं  तब्येतीच्या समस्या टाळता येतात. कडूनिंब खडीसारखेसोबत खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.मात्र योग्य आयुर्वेदित तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ती पानं खावी, मनाने काहीही प्रयोग करु नयेत. आयुर्वेदानुसार कडूनिंबाच्या फुलाचे सेवन उन्हाळ्यात  केले तर शरीर शांत राहण्यास मदत होते. या फुलाच्या सेवनानं पित्त कमी होते. इम्युनिटी चांगले राहते आणि इम्युन सिस्टम मजबूत होते. 

या पानांचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. ही पानं आतड्यातील खराब बॅक्टेरिया कमी करतात आणि गुड बॅक्टेरिया वाढतात. याच्या सेवनानं कोलनची स्वच्छता होते. ही पानं कॅन्सर मॅनेजमेंटमध्ये फायदेशीर ठरतात. एंटी इन्फ्लेमेटरी आणि एंटी डायबिटीक  शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. तुम्ही याच्या गोळ्या बनवूनही खाऊ शकता. 

खडीसाखर खाण्याचे फायदे

आयुर्वेदानुसार खडीसारखरेची चव गोड असते. याच्या सेवनानं खोकल्यापासून आराम मिळतो. इ्म्युनिटी मजबूत होते,   खडीसाखरेचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. हे एक नॅच्यरल माऊथ फ्रेशनरप्रमाणे काम करते. कडूनिंब आणि खडीसारखर हे एक चांगलं औषध आहे, मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ते घेणं योग्य.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलनरेंद्र मोदी