कॅन्सर हा लाखो कुटुंबांच्या चिंतेचं कारण बनला आहे. विशेषतः जेव्हा मुलींचा विषय येतो, तेव्हा प्रत्येक आई-वडिलांच्या मनात एकच भीती असते की, त्यांच्या मुलीला कोणताही गंभीर आजार होऊ नये. सर्वायकल कॅन्सर हा असाच एक धोकादायक आजार आहे, जो महिलांच्या आरोग्यावर गुपचूप मोठं नुकसान करतो. परंतु आता ही भीती दूर करण्याच्या दिशेने एक मोठं आणि आशादायक पाऊल उचलण्यात आलं आहे.
भारतातील मुलींना सर्वायकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेरमधून देशव्यापी HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेचं उद्दिष्ट दरवर्षी १४ वर्षांच्या सुमारे १.१५ कोटी मुलींना मोफत लस देणं हे आहे, जेणेकरून त्या भविष्यात या जीवघेण्या आजारापासून सुरक्षित राहू शकतील. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) म्हणजे काय आणि त्याचं लसीकरण का महत्त्वाचं आहे? हे जाणून घेऊया...
HPV म्हणजे काय?
HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा एक सामान्य व्हायरस आहे, जो प्रामुख्याने संपर्काद्वारे पसरतो. हा व्हायरस दीर्घकाळ शरीरात कोणत्याही लक्षणाशिवाय राहू शकतो. इतकंच नाही तर, HPV संक्रमणाचे काही प्रकार भविष्यात सर्वायकल कॅन्सरचं कारण बनू शकतात. गेल्या काही काळापासून महिलांमध्ये या कॅन्सरची प्रकरणं वेगाने वाढली आहेत म्हणूनच सरकारने ही मोहीम सुरू केली आहे.
ही लस कोणासाठी आहे?
सरकारने ही मोहीम प्रामुख्याने १४ वर्षांच्या मुलींसाठी सुरू केली आहे. तज्ज्ञांच्या मते, कमी वयात लस घेतल्यामुळे शरीरात मजबूत रोगप्रतिकारशक्ती तयार होते, जी भविष्यात संसर्गापासून संरक्षण करते. ही लस देशातील सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी आरोग्य केंद्रांवर मोफत उपलब्ध करून दिली जाईल.
HPV लसीकरण का गरजेचं आहे?
भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी सर्वायकल कॅन्सर हा एक सामान्य प्रकार आहे. जागरूकतेचा अभाव आणि वेळेवर तपासणी न झाल्यामुळे अनेकदा या आजाराचं निदान उशिरा होतं. HPV लस अशा संसर्गांपासून संरक्षण करतं जे कॅन्सरचे मुख्य कारण ठरतात. डॉक्टरांच्या मते, योग्य वयात लसीकरण केल्यास भविष्यात कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
लसीकरण कसं होणार?
ही मोहीम शाळा आणि सरकारी आरोग्य संस्थांच्या माध्यमातून राबवली जाईल. आरोग्य कर्मचारी मुलींना आणि त्यांच्या पालकांना याबद्दल जागरूक करतील. लसीकरणापूर्वी आवश्यक माहिती दिली जाईल आणि संपूर्ण प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडली जाईल.
लस सुरक्षित आहे का?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, HPV लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. जागतिक स्तरावर अनेक देशांनी याचा स्वीकार केला आहे. लस घेतल्यानंतर सौम्य ताप किंवा इंजेक्शनच्या जागी वेदना होणं यासारखे सामान्य दुष्परिणाम दिसू शकतात, जे थोड्या वेळात बरे होतात.
HPV लसीकरण हे केवळ एक इंजेक्शन नसून येणाऱ्या पिढीला कॅन्सरपासून वाचवण्याची एक मजबूत रणनीती आहे. कॅन्सरचं वाढत असलेलं प्रमाण पाहता योग्य माहिती आणि वेळेवर उचललेलं हे मोठं पाऊल आपल्या मुलींना सुरक्षित आणि निरोगी आयुष्य देऊ शकतं.
Web Summary : Government launches HPV vaccination drive to protect 1.15 crore girls from cervical cancer. The vaccine will be free at government health centers, preventing HPV infections that cause cancer. Experts emphasize early vaccination for strong immunity.
Web Summary : सरकार ने 1.15 करोड़ लड़कियों को सर्वाइकल कैंसर से बचाने के लिए एचपीवी टीकाकरण अभियान शुरू किया। यह टीका सरकारी स्वास्थ्य केंद्रों पर मुफ्त होगा, जिससे कैंसर पैदा करने वाले एचपीवी संक्रमण को रोका जा सकेगा। विशेषज्ञ मजबूत प्रतिरोधक क्षमता के लिए शीघ्र टीकाकरण पर जोर देते हैं।