Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?

प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?

रेफ्रिजरेटरमध्ये पाणी ठेवण्यासाठी खूप हलक्या दर्जाच्या वस्तू वापरल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:30 IST2025-05-20T16:30:10+5:302025-05-20T16:30:56+5:30

रेफ्रिजरेटरमध्ये पाणी ठेवण्यासाठी खूप हलक्या दर्जाच्या वस्तू वापरल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.

plastic glass or steel which water bottle is best for storing in the fridge | प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?

प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?

उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरमध्ये पाण्याची बाटली ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्हाला सहज थंड पाणी मिळेल. पण तुम्हाला माहिती आहे का प्लास्टिक, काच आणि स्टीलच्या बाटल्यांपैकी कोणती बाटली तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे? बरेचदा लोक विचार न करता बाटल्यांची निवड करतात. रेफ्रिजरेटरमध्ये पाणी ठेवण्यासाठी खूप हलक्या दर्जाच्या वस्तू वापरल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. प्लास्टिक, काच आणि स्टील, तिन्हींचे वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत. याबाबत जाणून घेऊया...

प्लास्टिक बाटली

प्लास्टिकच्या बाटल्या सर्वात जास्त वापरल्या जातात कारण त्या हलक्या आणि स्वस्त असतात. मात्र प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी ठेवून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्यात केमिकल्स मिसळतात.  BPA (बिस्फेनॉल ए) हे केमिकल आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं, विशेषतः जेव्हा प्लास्टिकच्या बाटलीत जास्त काळ गरम किंवा थंड पाणी ठेवलं जातं.

प्लास्टिकच्या बाटल्या सहज फुटू शकतात आणि त्यातील पाण्याची चवही बदलू असू शकते. तसेच प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, कारण प्लास्टिक विघटनशील नाही. जर तुम्ही प्लास्टिकची बाटली वापरत असाल तर ती BPA फ्री असल्याची खात्री करा.

काचेची बाटली

पाणी साठवण्यासाठी काचेच्या बाटल्या सर्वात सुरक्षित मानल्या जातात. ग्लासमध्ये कोणतेही केमिकल मिसळलं जात नसल्याने पाण्याची चव देखील तशीच राहते. काचेची बाटली पर्यावरणासाठी सुरक्षित आहे. पाण्याची शुद्धता राखण्यास देखील मदत होते.

काचेच्या बाटल्यांचा एक तोटा म्हणजे त्या जड असतात आणि लगेचच तुटण्याची शक्यता असते. जर तुमच्या कुटुंबात लहान मुलं असतील किंवा तुम्ही प्रवास करत असाल तर काचेची बाटली हा चांगला पर्याय असू शकत नाही. घरी पाणी साठवण्यासाठी काचेच्या बाटल्या वापरणं योग्य आहे. 

स्टीलची बाटली 

स्टीलच्या बाटल्या आता अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. स्टीलच्या बाटल्या मजबूत, टिकाऊ आणि आरोग्यासाठी खूप चांगल्या मानल्या जातात. या बाटल्या BPA-फ्री आहेत, ज्यामुळे पाण्याची शुद्धता आणि चव तशीच नाही. स्टीलमध्ये पाणी बराच काळ थंड राहतं, जे उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.

स्टीलच्या बाटल्या पर्यावरणासाठी देखील एक चांगला पर्याय आहेत कारण त्या पुन्हा वापरता येतात आणि दीर्घकाळ टिकतात. स्टीलच्या बाटल्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांपेक्षा महाग असतात आणि कधीकधी त्या थोड्या जड देखील असू शकतात.

पाणी ठेवण्यासाठी योग्य बाटली कोणती?

काच, स्टील आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. तुम्ही तुमच्या आरोग्य आणि लाईफस्टाईलनुसार योग्य बाटली निवडली पाहिजे. जर तुम्ही घरी पाणी साठवून ठेवत असाल तर काचेची बाटली हा सर्वोत्तम पर्याय असेल. जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा टिकाऊ आणि हलक्या वजनाची बाटली हवी असेल तर स्टीलची बाटली घेण्याचा विचार करा. तसेच जर बजेटची चिंता असेल तर प्लास्टिकच्या बाटल्या हा एक स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय असू शकतो, परंतु लक्षात ठेवा की त्या BPA-फ्री असाव्यात.

Web Title: plastic glass or steel which water bottle is best for storing in the fridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.