तुरटी ज्याला 'पोटॅशियम एल्युमिनियम सल्फेट' असं म्हटलं जातं. हे एक प्राकृतिक खनिज आहे ज्याचा वापर अनेक वर्षांपासून औषधांच्या स्वरूपात केला जात आहे. बरेच लोक शेविंगनंतर किंवा कापलं गेल्यानंतर तुरटीचा वापर करतात (Phitkari Gargle Benefits).
तुरटी एंटी सेप्टीक, एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी मायक्रोबिअल गुणांनी परिपूर्ण असते. तुरटी ओरल हेल्थसाठीही गुणकारी ठरते. रोज तुरटीच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं बरेच फायदे मिळतात. तुरटीच्या पाण्यानं गुळण्या का कराव्यात याची कारणं समजून घेऊ. (Rinse Your Mouth With Alum Water Every Day Know The Benefits)
तुरटीच्या पाण्यानं गुळण्या का कराव्या? (5 Benefits Of Gargling With Alum Water)
१) तोंडाचा दुर्गंध कमी होतो
तुरटीत अनेक एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि तोंडाला वास येत नाही, तुम्ही श्वासांच्या दुर्गंधीनं त्रासला असाल तर माऊथवॉश हा एक स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे.
2) हिरड्यांच्या समस्येवर आराम
जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा हिरड्या कमकुवत झाल्या असतील तर तुम्ही तुरटीचं पाणी वापरून सूज कमी करू शकता. यामुळे हिरड्या मजबूत होतात.
3) दातांचा पिवळेपणा आणि किडीपासून बचाव
तुरटीचे पाणी दातांवर जमा झालेली घाण आणि प्लाक काढून टाकण्यास मदत करते. रोज गुळण्या केल्यानं दातांमध्ये कॅव्हिटीजचा धोका कमी होतो.
4) तोंडाचा अल्सर कमी होतो
मनीपाल सिगना युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टनुसार तोंड येणं,आतल्या बाजूनं ओठ लाल होणं अशा समस्या तुम्हाला उद्भवत असतील तर तुरटीच्या पाण्यानं गुळण्या करायला हव्यात. ज्यामुळे जखम भरण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत होते. (Ref)
5) दातांच्या वेदनेपासून आराम
दात दुखत असतील तर तुरटी घातलेल्या पाण्यानं गुळण्या करून पाहा, लगेच आराम मिळेल आणि संक्रमणाचा धोका टाळता येईल.
तुरटीचे पाण्याचा योग्य वापर कसा करावा (How To Use Alum Water For Gargle)
एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक तुरटीचा छोटा तुकडा घाला. २ ते ३ वेळा तोंडात व्यवस्थित फिरवा आणि हा तुकडा काढून घ्या. हे पाणी ३० ते ४० सेकंद तोंडात ठेवून व्यवस्थित गुळण्या करा. ज्यामुळे तुम्हाला लवकर फरक दिसून येईल.
Web Summary : Alum, with antiseptic and antibacterial properties, offers multiple oral health benefits. Gargling with alum water combats bad breath, strengthens gums, reduces tooth yellowing and cavities, heals mouth ulcers, and alleviates toothache. A simple, effective oral care solution.
Web Summary : फिटकरी, एंटीसेप्टिक और जीवाणुरोधी गुणों से भरपूर, मौखिक स्वास्थ्य के लिए कई लाभ प्रदान करती है। फिटकरी के पानी से गरारे करने से सांस की बदबू दूर होती है, मसूड़े मजबूत होते हैं, दांतों का पीलापन और कैविटी कम होती है, मुंह के छालों को ठीक किया जाता है और दांत दर्द से राहत मिलती है। एक सरल, प्रभावी मौखिक देखभाल समाधान।